Homeचंद्रपूरब्रम्हपुरीराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मालडोंगरी येथे 1 कोटी...

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मालडोंगरी येथे 1 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

ब्रम्हपुरी: तालुक्यातील मालडोंगरी येथे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते 1 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे.

गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातुन जलजीवन मिशन अंतर्गत 88 लाख रुपयांच्या नळयोजना मालडोंगरी येथे मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचे भूमिपूजन यावेळी पार पडले. तर तांडा वस्ती अंतर्गत 8 लाख रुपयांच्या सिमेंट कॉंक्रिट रस्ता व नाली बांधकामांचे लोकार्पण यावेळी करण्यात आले.
सोबतच आदर्श लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या बांधकामासाठी गावातील युवकांनी आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कडे मागणी केली होती. त्यामुळे स्वखर्चातून आमदार विजय वडेट्टीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बांधकामासाठी पुढाकार घेतला असुन पुतळ्याच्या बांधकामाचे भुमिपुजन सुध्दा यावेळी करण्यात आले आहे.
यावेळी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, माजी सरपंच राजेश पारधी, सरपंच मंजुषाताई ठाकरे, उपसरपंच विनोद घोरमोडे, नाट्य कलावंत हिरालाल पेंटर, ग्रा.पं.सदस्या धनश्री सिडाम, ग्राम.पं.सदस्य राजू पिलारे, ग्राम.पं.सदस्या भावना गायकवाड, ग्राम कॉंग्रेस कमेटीचे सचिव तुळशिदास राऊत, विशाल सहारे, आकाश बरडे, रवी ठाकरे, निकेश पारधी, शामराव पिलारे, गिता मेश्राम, स्वप्नील नागमोती, जनबंधू मॅडम, धनपाल सिडाम, मुरलीधर ठाकरे, रोशन रासेकर, प्रफुल पारधी, राहुल पारधी, कार्तिक राऊत, अमित बगमारे, नानाजी पारधी, मंगेश पारधी, स्वप्नील नागमोती, राजू चौधरी, प्रशांत कामडी यांसह गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.
गावात विविध विकासकामे मोठ्या गतीने सुरू असल्याने गावकऱ्यांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!