चंद्रपूर- भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिपत्याखाली असलेल्या राजस्थान येथील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातील कार्यक्रम समितीच्या अध्यक्ष पदाकरिता राजस्थानचे राज्यपाल आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष कलराज मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या झालेल्या बैठकीमध्ये तेथील कार्यकारी समितीने एकमताने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री मा.सुधीरभाऊ मूनगंटीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करून अध्यक्षपदाकरिता त्यांची नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्री मा. सुधीरभाऊ मूनगंटीवार यांची राजस्थानातील पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कलावंत तसेच महाराष्ट्रातील लोककलांवंतासाठी ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे.