Homeचंद्रपूरसमता पर्व निमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली भीम जयंती... समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा...

समता पर्व निमित्त समाजकार्याच्या विद्यार्थ्यांनी साजरी केली भीम जयंती… समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार

चंद्रपूर – स्व.सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली,चंद्रपूर एम. एस. डब्लू. दुसऱ्या वर्षात सत्र चौथ्याच्या विद्यार्थ्यांना सामुदायिक विकास विशेषिकरणातील शिक्षण घेत असताना भिवापूर वॉर्ड चंद्रपूर येथे दि.14/04/2023ला महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ.सुनील साकुरे सर यांच्या नियंत्रणात आणि क्षेत्रकार्य परिवेक्षिका प्रा. डॉ.प्रगती नरखेडकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात आज विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्य कार्यक्रम घेण्यात आला.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग सहायक आयुक्त समाजकल्याण चंद्रपूर,सामाजिक न्याय पर्व कार्यक्रम सुरु असून त्या अंतर्गत प्रबुद्ध विहार भिवापूर वॉर्ड चंद्रपूरच्या अध्यक्षा मा. गिरजाताई मुन आणि सचिव मा. शुभांगी मानकर उपस्थित होत्या. तर वार्डातील प्रतिष्ठित व्यक्ती मा.ऍड. तेलंग सर यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले की, नागरिकांनी एकत्रित येण्याची गरज असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपले पाहिजे. हा कार्यक्रम प्रबुद्ध विहार भिवापूर वॉर्ड चंद्रपूर येथे घेण्यात आला. या कार्यक्रमाला वॉर्डातील पन्नासच्या जवळपास नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. आर. एम. कॉलेज ऑफ सोशल वर्क पडोली चंद्रपूर, येथील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे संचालन कु. पूनम रामटेके या विद्यार्थीने केले,तर आभार पल्लवी तुपसुंदर या विद्यार्थीने केले. या कार्यक्रमाला आयोजक म्हणून लाभलेले विद्यार्थी प्रतीक्षा मातेरे, समीक्षा कुळमेथे, अश्विनी मगरे, अमोल कोरवते, रोशन नन्नावरे, अमित राऊत,संकेत जावळे, लोकेश कुमरे उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!