Advertisements
गडचिरोली :- भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके शोधण्यात विशेष अभियान पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. ‘टीसीओसी’ च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात धडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे.
Advertisements
नेलगुंडा परिसरात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान काल सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांना जमिनीत स्फोटके आढळून आली.
तीन वायर बंडल, बॅटरी, डेटोनेटर इत्यादी साहित्य पोलिसांनी शिताफीने बाहेर काढून बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या मदतीने ही स्फोटके नष्ट करण्यात आली. यामुळे मोठा घातपात टळला. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
Advertisements
Advertisements