Homeचंद्रपूरकुडेसावली येथे महिला दिन साजरा...

कुडेसावली येथे महिला दिन साजरा…

दिनांक ०९ मार्च २०२३ ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कुडेसावली व सावित्रीबाई फुले ग्रामसेवा संघ कुडेसावलीच्या च्या संयुक्त विद्यमाने महिलांचे विविध कार्यक्रम व यशस्वी महिला तथा माजी ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे उद्घाटक सौ. अंगुलीमाला चांदेकर पोलीस पाटील कुडेसावली सहउद्घाटक श्री. वासुदेवजी मोरे माजी सरपंच, ग्रा.पं., कुडेसावली तर अध्यक्ष सौ. वैष्णवीताई बोडलावार माजी सदस्य, जिल्हा परिषद, चंद्रपूर प्रमुख अथिती श्री. शालिकरावजी माऊलीकर संवर्ग विकास अधिकारी, गोंडपिपरी स्वागताध्यक्ष श्री. मारोतीजी मडावी सरपंच, ग्रामपंचायत, कुडेसावली सत्कारमुर्ती कु. करिष्माताई मोरे पोलिस उप-निरिक्षक, अहेरी सौ. आनंदाबाई टेकाम माजी सरपंच, ग्रा.पं., कुडेसावली श्री. कैलासजी पिपरे माजी सरपंच, ग्रा.पं., कुडेसावली, स्व. सितारामजी चांदेकर माजी सरपंच, ग्रा.पं., कुडेसावली सौ. नंदाताई सुर माजी सरपंच, ग्रा.पं., कुडेसावली श्री. मधुकरजी मोरे माजी उपसरपंच, ग्रा.पं., कुडेसावली श्री. श्रावणजी मोरे माजी उपसरपंच, ग्रा.पं., कुडेसावली यांचा सत्कार करण्यात आला. महिलांच्या कबड्डी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, चम्मच गोळी स्पर्धा, रनिंग स्पर्धा, घेण्यात आल्या त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. अध्यक्षीय विचार व्यक्त करताना सौ. वैष्णवीताई बोडलावार म्हटल्या कि महिलां आता कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात मोट्या प्रमाणात महिलांनी स्वतःला सिद्ध केलेले आहे. त्याचप्रमाणे सत्कारमुर्ती कु. करिष्माताई मोरे यांनी सत्कार प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना अतिशय भावुक होऊन म्हणाल्या कि, ज्या शाळेत मी शिकले, खेळले त्याच शाळेच्या पटांगणावर माझा सत्कार होताना अतिशय आनंद वाटत आहे. गावातील विध्यार्थी/विधार्त्यानी प्रयत्नांची पराकाष्ट करून आपल्या आई, वडिलांचे, गावाचे नाव मोठे करावे. असा मोलाचा सल्ला दिला. स्वागताध्यक्ष श्री. मारोतीजी मडावी सरपंच ग्रामपंचायत, कुडेसावली यांनी गावाच्या विकासासाठी सर्वानी मिळून प्रयत्न केले पाहिजे. लोकांचा सहभाग, लोकप्रतिनिधीची मदत, अधिकाऱ्याचे सहकार्य वेळोवेळी मिळण्यास ग्रामविकास होण्यास नक्कीच मदत होते. विशेष अथति मा. शालिकरावजी माऊलीकर यांनी आपल्याला घटनेद्वारे मिळालेले सर्व अधिकारांचा सर्वतोपरी वापर करून महिलांनी आपली प्रगती करणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद शाळा मधील शिक्षण दर्जेदार असून प्रत्येक पालकांनी जिल्हा परिषद शाळा मध्येच मुलांना शिकवावे. अन्य देशात महिलांचे अधिकार मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आपल्या देशातहि हे अधिकार अनेक संघर्ष करून मिळाले त्याचा फायदा प्रत्येक स्त्रीने घेतला पाहिजे असे मनोगतात म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेश डोडीवार उपसरपंच तर आभार संजय चामलाटे यांनी म्हानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेन्द्र खोब्रागडे सर ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य विलास सूर, दिपाबाई उपरे. नंदाताई सूर, सुनंदा टेकाम, तनुजा गेडाम असेच सावित्रीबाई फुले ग्रामसेवा संघाच्या सर्व महिला गटांनी अथक परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!