Homeचंद्रपूरराष्ट्रवादी काँग्रेस,चंद्रपूर तर्फे धरणे आंदोलन...

राष्ट्रवादी काँग्रेस,चंद्रपूर तर्फे धरणे आंदोलन…

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक)

चंद्रपूर- गुरुवार, दि ०९ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विविध सुविधा पूर्ण करण्यात याव्या याकरिता जेटपुरा गेट इथे धरणे आंदोलन करण्यात आले.

राहुल देवतळे यांच्या मागण्या याप्रमाणे आहे.
१) रुग्णांना संपूर्ण औषध रुग्णालयातून मिळायला हवी
२)अनेक वर्ष बंद असलेले उपहार गृह सुरू करण्यात यावे
३) संडास बाथरुम सुसज्ज करण्यात यावे
४) मोटर सायकल स्टँड यांचा करार संपला असून अवैध कर वसुली चालू असून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी
५) रुग्णालयातील कामगार पुरवठा अनेक वर्षांपासून एकाच व्यक्तीला देण्यात येत आहे त्याची पुर्ववत चौकशी करण्यात यावी.

या आंदोलनाला संभाजी खेवले, कुमार पाल, अक्षय सगदेव, निमेश मानकर, आशिष खडसे, शुभम ठाकरे हे उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!