Homeचंद्रपूररिपब्लिकन क्रांती परिषदेकरीता जनजागृती मोहिमेला झनझनित सुरुवात..

रिपब्लिकन क्रांती परिषदेकरीता जनजागृती मोहिमेला झनझनित सुरुवात..

बळीराम काळे, जिवती

जिवती : ( ता.प्र.) चंद्रपूर जिल्हातच नव्हे तर संपूर्ण जगात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केलेला आहे.तो म्हणजे “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया; आणि तो टिकून ठेवणे ही काळाची गरज आहे.म्हणून मा.आशोक ऊमरे आणि दयानंद लांजेवार व त्यांचे सहकारी तनमन धनाने बाबासाहेबांचं कार्य करीत आहेत.तरी पण “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’ हा पक्ष सध्या ज्यांच्या हातात आहे.
त्यांना हा पक्ष सर्व सामान्यांना खुला केला तर बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते लोकशाही मार्गाने कुठे आपलीच हकालपट्टी करतील की काय ? या अनामिक भितीपोटी हा पक्ष वाढीसाठी काहीच हालचाल करीत नसल्याने व पक्षाची सत्ता सुत्रे हाती असलेल्या पदाधिकाऱ्यांच्या घोर उदासीनतेमुळे साऱ्या जगाला आदर्शवत बाबासाहेबांचा पक्ष आज मोडकळीस आलेल्या परिस्थितीत दिसत आहे.
तसेच अन्य पक्ष संघटनेचे कार्यकर्ते आमचाच पक्ष बाबासाहेबांच्या विचारधारेनुसार वाटचाल करीत आहे.
अशी भावनिक वर्तणूक करीत असल्याने बाबासाहेबांच्या अधिकृत रिपब्लिकन पक्षाची कार्यकर्त्यांविना दयनीय अवस्था निर्माण झाली आहे.
अशा निराशेच्या गर्तेतून मोडकळीस येत असलेल्या पक्षाला बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांच्या “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या’ प्रचारकांनी १६ एप्रिल २०२३ ला अमरावती येथे रिपब्लिकन क्रांती परिषदे करीता संयुक्त राष्ट्रसंघात प्रथम भाषण देणारे, मॉकडोर सामा. संस्थेचे अध्यक्ष व रिपब्लिकन चळवळीचे भाष्यकार मा. अशोक भारती, दिल्ली, यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्घाटक आदरणीय भंते ज्ञानज्योती परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या परिषदेकरीता जागृतीचा एक भाग म्हणून अमरावती शहरातून रिपब्लिकन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन त्यांना रिपब्लिकन पक्षाचे संविधान आणि बाबासाहेबांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सामील होण्यासाठी भारतीय जनतेला आवाहन करणारे खुले पत्र पुस्तिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रचारक अशोककुमार उमरे आणि देवानंद लांजेवार कडून विनामूल्य भेट देण्यात येत आहे. सदर जनजागरण मोहीमेला वकिल, डॉक्टर, शिक्षक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते मंडळींसह सर्व सामान्य रिपब्लिकन जनतेचा उदंड सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!