Homeचंद्रपूरविविध सामाजिक उपक्रम राबवित नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांचा वाढदिवस साजरा..

विविध सामाजिक उपक्रम राबवित नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांचा वाढदिवस साजरा..

सिंदेवाही – येथील नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांचा आज वाढदिवस. यानिमित्ताने त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे दाखल रुग्णांना फळे वाटप तसेच प्रभागातील गरजू नागरिकांना भेटवस्तु देऊन सामाजिक उपक्रमातून आपला वाढदिवस साजरा केला.

समाजात जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समाजाचे देणे असते. इतरांच्या सुख- दुःखात सहभागी होऊन ऋणानुबंध जोपासणाऱ्या व्यक्तीलाच जिवन जगण्याची प्रेरणा मिळते. याचीच प्रचिती आज सिंदेवाही- लोनवाही नगर पंच्यायतीच्या प्रभाग क्रमांक १३ च्या नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांच्या वाढदिवशी दिनी राबविलेल्या सामाजिक उपक्रमातून आली.त्यांनी आपल्या वाढदिवशी दिनी नाहक खर्च न करता स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथे दाखल असलेल्या रुग्णांना फळे व इतर खाऊ साहित्याचे वाटप केले.

सोबतच आपल्या प्रभागातील गरजू लोकांना भेट वस्तू देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. जन आशीर्वादाने आपल्याला मतदार राज्यांनी लोकप्रतिनिधित्व देऊन समाजात आपला सन्मान वाढवून जबाबदारी सोपविली. जनतेच्या अपेक्षा यावर आपण खरे उतरण्यासाठी सदैव तत्पर आहे. तर प्रभाग वासियांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून शहरातील नागरिकांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी तसेच संपूर्ण शहरासह आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहणार असल्याचा मानस नगरसेविका वैशाली पुपरेड्डीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

तत्पूर्वी त्यांनी आपल्या प्रभागात अनेकदा विविध प्रकारच्या वस्तू देऊन सामाजिक कार्याचा वारसा जपत सेवाभावी कार्यातून अनेकांची मदत केली. याप्रसंगी प्रामुख्याने शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रीती सागरे, मुरमाडी सरपंच रुपाली रत्नावार, जयश्री नागापुरे (कावळे) व इतर महिला काँग्रेसच्या पदाधिकारी नगरसेविका व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!