Homeचंद्रपूरजिवतीमहाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे दुर्लक्ष.... शेडवाही येथील विजेचे खांब दिसते आहे,...

महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीचे दुर्लक्ष…. शेडवाही येथील विजेचे खांब दिसते आहे, धोकादायक”

बळीराम काळे,जिवती

जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत शेडवाही(भारी) अंतर्गत शेडवाही येथील दोन विद्युत लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
बुधाराव कोटनाके यांच्या घरापासून सोमजी सितू वेडमे यांच्या घराशेजारील वीज वाहक खांब झुकलेला आहे.आणि या झुकलेल्या खांबमुळे जर का,जोराचा वादळ किंवा हेलकावा आला तर खांब पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच गावातील दशरथ वेडमे यांचे शेत गावशेजरी असल्याने यांच्या शेतातील विद्युत तार हे हाताला पोहोचतील येवढ्या उंचीपर्यंत येऊन लोंबकळत आहेत व हवेमुळे हेलकावे खात आहेत. त्यामुळे शेतात काम करत असता,काही जीवित हानी होणार नाही.त्याकरिता दशरथ वेडमे यांनी स्पोट म्हणून आपल्या शेत्तातील विद्युत तारेला बांबूची दिकण दिली आहे. रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांच्या जिवीतास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या संदर्भात महावितरण जिवती येथील विद्युत कर्मचारी,अधिकाऱ्यांना वारंवार कळवूनही अधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न संतापलेल्या गावकरी मंडळीकडून उपस्थित केल्या जात आहे.
वास्तविक पाहता पावसाळा लागण्यापूर्वी प्रत्येक विधुत उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात तारा, खांब याचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी तारा बदलणे, झुकलेले खांब सरळ करणे, लोंबकळलेल्या तारा सरळ करणे तुटलेल्या तारा जोडणे ही कामे प्राधान्याने करून घेणे गरजेचे असताना सबंधित विभागाचे याकडे कमालीचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.

सबंधित विभागाने जातीने लक्ष घालून त्वरित शेदवाही येथील झुकलेला खांब व तारेचे सोय करून होणारी तारे अभावी जीवित हानी टाळावी…– गोसाई मोंडी गुरनुले, ग्रामस्थ (ग्रामपंचायत शेडवाही,(भारी)

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!