चिंचाळा येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी संपन्न.

987

नागाळा(सि) ग्रामपंचायत अंतर्गत चिंचाळा तालुका चंद्रपूर येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली दोन दिवसीय या कार्यक्रमात पहिल्या दिवशी पहाटे घटस्थापना बाबाराव बोभाटे महाराज यांच्या अखंड ब्रम्हवाणीतून श्री श्रीहरी नरुले यांचे हस्ते करण्यात आली. त्यानंतर झालेल्या ध्यानावर नामदेव आस्वले मुख्याध्यापक जि प शाळा चिंचाळा यांचे मार्गदर्शन झाले .सकाळच्या सत्रमध्ये विमलादेवी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज वांढरी तर्फे गावकऱ्यांसाठीआरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले .
त्यानंतर आदर्श ग्राम निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली .श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते श्री नरेंद्रजी जीवतोडे नंदोरी यांनी आदर्श ग्रामसभा ग्रामपंचायतचे विविधबँक खाते व शासनाच्या योजनांची माहिती दिली. विषमुक्त नैसर्गिक शेती या विषयावर रामराव घुमनर कांदळी, तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ यांनी ग्रामगीतेत संगीतल्यानुसार त्यांच्या शेतात प्रत्यक्ष राबविलेल्या शेती अनुभवांचे कथन केले आणि आज ही काळाची गरज असल्याचे सांगितले. व्यसनमुक्ती प्रशिक्षक मारुती साव,चंद्रपूर यांनी आपल्या अमोघवाणीतून व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम भजन व इतर गीतांच्या माध्यमातून समजावून दिले. सायंकाळच्या सत्रात विधवा महिलांचा व निस्वार्थ सेवा देणाऱ्याचा मानसन्मान कार्यक्रम घेण्यात आला याप्रसंगी रजनीताई घुगरे मूल यांचे मार्गदर्शन लाभले
रात्रोला सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली.यावेळी प्रेमलाल पारधी घुगुस यांचे मार्गदर्शन झाले. सामुदायिक प्रार्थनेनंतर सप्त खंजिरी वादक तुषारदादा सूर्यवंशी नागपूर यांचे प्रबोधन पर किर्तन झाले. यावेळी गावाच्या सरपंच्या श्रीमती शोभाताई चिमुरकर तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी आणि गावातील मान्यवरांची उपस्थिती होती.
दुसऱ्या दिवशी ध्यानावर पंजाब दादा मेश्राम दाताळा यांचे मार्गदर्शन झाले तर रामधून संपूर्ण गावातून( शोभायात्रा )काढण्यात आली .रस्ते रांगोळ्यांनी सजविल्या गेले.यावेळी गावातील तथा परिसरातील भजन मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. यावेळी रामधून चे महत्वावर डॉक्टर अरविंद ठाकरे कवठाळा यांनी विचार प्रकटन केले, वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांना मौन श्रद्धांजली देण्यात आली त्याकरीता राज दादा घुमनर यांनी आपल्या वाणीतून परिसरात वातावरण निर्मिती करण्याचे कार्य केले
दुपारच्या सत्रात युवा कीर्तनकार आशिष माणूसमारे पाचगाव तालुका वरोरा यांचे समाजप्रबोधनपर कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ग्रामस्थांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक मेश्राम ,उपाध्यक्ष विश्वास पानघाटे ,सचिव दत्तूजी नांदे, कोषाध्यक्ष रामदास वाघाडे ,सहसचिव संजय वाटेकर ,कार्याध्यक्ष प्रभाकर काळे ,स्वागताध्यक्ष देविदास आत्राम, तसेच श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सर्व सदस्यांचे तसेच गावकरी युवकांचे ,महिलांचे व ग्रामस्थांचे खूप मोठे सहकार्य लाभले.