Homeनागपूर'वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा' हे पुस्तक मलेशिया येथे प्रकाशित होणार

‘वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा’ हे पुस्तक मलेशिया येथे प्रकाशित होणार

नागपूर : ‘वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा’ हे जयंत साठे लिखित समीक्षणात्मक पुस्तक असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तीन फेब्रुवारी 2023 रोजी मलेशिया येथील आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रो. डॉ. उत्तम अंभोरे हे असून त्यांचे ह्या ग्रंथाला प्रास्ताविका आहे. डॉ. उत्तम अंभोरे हे वामनदादा कर्डक अध्यासन केंद्राचे संचालक असून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत आहेत. समीक्षक संदेश ढोले यांनी या पुस्तकाचे आकलन केले आहे. ज्येष्ठ संपादक भूपेंद्र गणवीर यांची प्रस्तावना असून ब्लर्ब समीक्षक, कवी व विचारवंत डॉ.अशोक पळवेकर यांचे आहे. मुखपृष्ठ जागतिक चित्रकार बळी खैरे यांचे आहे. हे पुस्तक नोशन प्रेस डॉट कॉम या चेन्नईच्या जागतिक कीर्तीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले असून, हे पुस्तक वाचकांना अॅमेझोनवर उपलब्ध होईल.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!