Homeचंद्रपूरआमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन*

चंद्रपूर : वरोरा – भद्रावती मतदार संघात सर्वांगीण विकास करण्याकरता धानोरकर दाम्पत्य नेहमी आग्रही असतात. ९ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या वाढदिवसानिमित्य उद्या ८ जानेवारी २०२३ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात ४१ किमी मॅरेथॉन, गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप व वैद्यकीय उपकरण भेट व प्रसिद्ध प्रबोधनकार अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनपर गीतांचा या कार्यक्रमाचा समावेश आहे.

मॅरॅथॉन स्पर्धेत प्रथम पारितोषिक १ लाख, द्वितीय पारितोषिक ५१ हजार, तृतीय पुरस्कार ३१ हजार, चतुर्थ पारितोषिक २१ हजार, पाचवे पारितोषिक ११ हजार रुपये देण्यात येणार आहे. हि मॅरॅथॉन वरोरा येथील रत्नमाला चौक ते पडोली चौक चंद्रपूर येथे ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ६.३० वाजता होणार आहे. तसेच गांधी चौक सायंकाळी ६ वाजता राज्यस्तरीय ४१ किमी मॅरेथॉन स्पर्धेचे बक्षीस वितरण, गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप व वैद्यकीय उपकरण भेट व प्रसिद्ध प्रबोधन अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत राज्यातून मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!