Homeचंद्रपूरसामाजिक दायित्व असलेल्या तरुणांनी जपली मानुसकी...

सामाजिक दायित्व असलेल्या तरुणांनी जपली मानुसकी…

दोन दिवसापूर्वी भटाळी या गावात राहणारे संजयभाऊ गांडलेवार यांचे दुःखत निधन झाले. संजयभाऊ गांडलेवर हे त्यांच्या घरासमोर पडल्यामुळे त्यांच्या मेंदूची नस फाटली त्यात त्यांना सरकारी हॉस्पिटल चंद्रपूर येथे भरती करण्यात आले,

पण त्यांना तिथून नागपूर येथील सरकारी हॉस्पिटल मध्ये रेफर करण्यात आले. परंतु या स्तलांतरणात त्यांची प्रकृती खालावल्याली आणि त्यातच त्यांच्या मृत्यू झाला. काही महिन्यापूर्वी त्यांना पत्नीशोक झालेला होता आणि परत आता संजयभाऊ गांडलेवार यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांचे लहान दोन मूल आई-वडीलास पोरके झालेले आहेत.

ही बातमी काही सामाजिक दायित्व असलेल्या तरुणांना समजली, अशा दुःखद प्रसंगी सामाजिक भावनेतून त्यांना थोडासा हातभार लागावा म्हणून त्यांना छोटीसी आर्थिक मदत म्हणून 10,000 रु. चा धनादेश दिनांक 06/01/2023 ला त्यांच्या मुलांना देण्यात आला.

यात सामाजिक कार्यकर्ते सचिन उपरे, गौरीशंकर मेहता, शिवा मिनरवार, मुरली तिवारी, लक्ष्मण नेहारे, विकास वाढई, राजू मोलगुरु, वासुदेव सवडे, शरद देवतळे, विकास पेंद्राम आणि रजनीश रायपुरे यांनी मदत केली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!