Homeअहेरीमाजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची आलापल्ली येथील डीएफओ टोलीया यांच्याशी...

माजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची आलापल्ली येथील डीएफओ टोलीया यांच्याशी चर्चा.. लवकरच अहेरी खमनचेरूचे काम होणार सुरु : माजी जी. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नाना यश

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील ग्रा.प. खमनचेरु-अहेरी हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्याचा विकास कधी होणार तरी अहेरी खमनचेरू तालुक्याला जोडणारा हा एकमेव मुख्य मार्ग आहे. सिएमजिएसवाय च्या अधिकाऱ्यांनी या रोडचे काम सुरु करून जनेची मागणी पूर्ण करायला तयार असतांना वनवीभागाचे काही कर्मचारीयांनी या कामात आडकाटी टाकून रोकून धरले असून अहेरी येथील माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यानी वन अधिकारी डिएफओ यांना याबाबद विचारणा केले असता अहेरी खमनचेरू रोडचे काही भाग वनविभागाच्या अखत्यारीत येत असल्याने वन विभागाने काम रोखले अशी चर्चा अहेरी व खमनचेरू गावात सुरु आहे. जे रोड मागील पन्नास वर्षांपासून असून अचानक पणे वन विभाच्या अखत्यारीत कसे काय? असा प्रश्न जनता करीत आहे. जेव्हा विकास काम होणार असते तेव्हा वनविभाग विकास रोकून धरतात हे मात्र समजण्यापलीकडचे आहे. जनता वेळो वेळी वन विभाला मदत करत असते, मात्र वन विभाग मात्र जनेचे काम होऊ देत नाही हि, मात्र चिंतेची बाबा आहे.

यावेळी सुनीता कुसनाके माजी जि.प. सदस्य, अहेरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, विलास सिडाम नगरपंचायत सदस्य, विलास गलबले नगरपंचायत सदस्य, शायलू मडावी सरपंच खमनचेरु, वंदना दुर्गे सदस्य महागाव व इतर कार्यकर्ते आलापल्ली वनविभागाच्या कार्यलयातील डिएफओ टोलिया यांच्यासोबत अहेरी खमनचेरू रोडचे काम बंद असल्याबाबत चर्चा करून रोडचे काम तात्काळ काम सुरु करण्याकरीता बोलनी केले. त्यावेळी डिएफओ टोलिया यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना सूचना केले व कोणत्याही प्रकारचे काम बंद पाडू नये, अशी सूचना करून रोडचे काम सुरु करण्याचे तोंडी आदेश डिएफओ यांनी दिले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!