Homeअहेरीअहेरी पत्रकार संघटनेच्या वतीने रुग्णाना व त्यांच्या नातेवाईकांना फळे व बिस्किट वाटप...आचार्य...

अहेरी पत्रकार संघटनेच्या वतीने रुग्णाना व त्यांच्या नातेवाईकांना फळे व बिस्किट वाटप…आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

प्रितम गग्गुरी(उपसंपादक)

अहेरी- येथील उपजिल्हा रुग्णालयात 6 जानेवारी पत्रकार दिनी अहेरी पत्रकार संघटनेच्या वतीने रुग्णाना व रुग्णाच्या नातेवाईकांना फळे व बिस्किट वितरित करण्यात आले.

प्रथमतः संघटनेचे अध्यक्ष प्रकाश दुर्गे , सचिव सुरेंद्र अलोणे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संजय उमाटे यांच्या शुभहस्ते मराठी वृत्तपत्र सृष्टिचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पमाला अर्पण करून जीवनावर प्रकाश टाकन्यात आले. त्या नंतर डॉ.संजय उमाटे यांच्या शुभहस्ते रुग्णाना व रुग्णाच्या नातेवाइकाना फळे व बिस्किट वितरित करण्यात आले. सोबतच संघटनेच्या वतीने रुग्णाची व त्यांच्या नातेवाइकांची आस्थेने विचारपुस करण्यात आले.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष प्रशांत नामनवार, कोषाध्यक्ष अशोक पागे, विवेक बेझलवार, प्रतीक मुधोळकर, अमित बेझलवार, सुधाकर उमरगुंडावार, गिरीष मद्देर्लावार, दीपक सुनतकर, संतोष मद्दीवार, विजय सुनतकर, संजय धुर्वे, आशीष सुनतकर, रवि नेलकुद्री, पंकज नौंनुवार आदी संघटनेचे सदस्य व प्रतिष्ठित नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!