भीमा कोरेगाव विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी भीमसागर उसळला… बार्टी संस्थेच्या आयोजनामुळे लाखो अनुयायांना मिळाल्या सुविधा…५० हजार अनुयायांना भोजन वाटप…

276

भीमा कोरेगाव – ऐतिहासिक भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनी मानवंदना देण्यासाठी १ जानेवारी २०२३ रोजी संपूर्ण देशातून व महाराष्ट्रातून आलेल्या लाखो भीमसैनिकांनी अनुयायानी आपल्या पूर्वजांच्या शौर्याला विजय स्तंभास मानवंदना दिली.समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, बार्टी संस्थेचे महासंचालक मा़. धम्मज्योती गजभिये, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यांनी विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.यावेळी समाजकल्याण व बार्टी संस्थेतील तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन आयोजनाची व नियोजनाची जबाबदारी बार्टी संस्थेकडे देण्यात आली.समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सरकारने भीमा कोरेगाव शौर्य दिन उत्सव समिती स्थापन केली. डॉ. नारनवरे, मा. गजभिये यांनी शौर्य दिनी अनुयायांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्याशी समन्वय साधून योग्य नियोजन केल्यामुळे शौर्यदीनी लाखो अनुयायांना सुविधा उपलब्ध झाल्या.

बार्टी संस्थेच्या वतीने विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या मान्यवरांना बार्टी संस्थेचे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये, यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. बार्टी संस्थेचे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून विजयस्तंभाच्या सजावटीत महार रेजिमेंटचे चिन्ह व तिरंगा, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विजय स्तंभास भेट दिलेला फोटो लावण्यात आला. त्यांचे भिमसैनिकांनी स्वागत केले.

तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर व ईतर महापुरुषांच्या जीवनावरील मूल्यवान पुस्तकांच्या ८५% सवलत या दरात विक्री करणाऱ्या पुस्तक स्टॉलचे व भोजन वाटप स्टाॅलचे उद्घाटन डॉ. नारनवरे, मा. गजभिये यांच्या हस्ते करण्यात आले.
रांगेत उभे राहून अनुयायांनी बार्टी पुस्तक स्टाॅल वरून पुस्तके मोठ्या प्रमाणात खरेदी केली. बार्टी संस्थेच्या वतीने भिमसैनिकांना अनुयायांना मोफत भोजन वाटप करण्यात आले.भिखु संघ, पोलिस दल, स्वच्छता कामगार, समता सैनिक दलाचे जवान आदीनी भोजनाचा लाभ घेतला.

तसेच जयस्तंभ परिसर, तोरणा पार्किंग शिक्रापूर, पेरणे टोल नाका पुस्तक स्टाॅल आदी ठिकानी बार्टी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती अनुयायांना देऊन माहिती पुस्तिका देण्यात आली.
समाज कल्याणचे आयुक्त डॉ. प्रशात नारनवरे, बार्टी संस्थेचे महासंचालक मा. धम्मज्योती गजभिये, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यांनी अनुयायांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली व नियंत्रण कक्षेतुन आढावा घेतला.

शासकीय यंत्रणा आणि भीमसैनिकांना अनुयायांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठी मेहनत घेतली.
श्रीमती इंदिरा अस्वार निबंधक बार्टी, श्रीमती नंदिनी आवडे, विभागप्रमुख, श्रीमती स्नेहल भोसले, विभागप्रमुख, राजेन्द्र बरकडे, लेखाधिकारी, कार्यालयीन अधीक्षक श्री. सचिन जगदाळे, संध्या नारखडे, प्रकल्प व्यवस्थापक नितिन सहारे, डॉ. प्रेम हनवंते, डॉ. सारिका थोरात, महेश गवळी, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक नसरीन तांबोळी, नरेश गोटे, डॉ. संभाजी बिराजे, डॉ. अंकुश गायकवाड, मंजुर तडवी, विशाल शेवाळे, जनसंपर्क अधिकारी रजनी वाघ, रामदास लोखंडे, यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी समतादुत यांनी मेहनत घेतली.