Homeचंद्रपूरचंद्रपुरात अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन...

चंद्रपुरात अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर)

चंद्रपूर: नम्रता समूह बागला कॉन्व्हेन्ट बागला चौक, चंद्रपूर या समूहाला 22 नोहेंबर 2022 ला 25 वर्षे पूर्ण झाली. 25 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रेंजर कॉलेज, चंद्रपूर येथे दिनांक ९ डिसेंबर २०२२ पासून सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस. नम्रता या समूहकडून गेल्या 25 वर्षामध्ये अनेक मद्यप्रेंमीना दारू पासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला. अनेक कुटुंब सुखी आणि समाधानी जीवनाचा आनंद घेत आहे.

अधिवेशनाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले अजित जी यांनी मी हरलो तर जीवनातून हरलो व स्वतःचे आत्मपरीक्षण ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले. अमेरिका येथील रॉय सर यांनी व्यक्त होताना पाचवी व सहावी पायरीवर कश्या प्रकारे काम करायचे यावर मार्गदर्शन करीत उपस्थितांचे लक्ष वेधले. हे कसे घडते व स्पॉन्सरचे महत्व आपल्या जीवनात किती महत्वाचे आहे हे त्यांनी आपल्या अनुभवातून व्यक्त केले. हैदराबाद येथील कृष्णमूर्ती यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त करतांना म्हटले की आमचे जीवन आम्ही अल्कोहोलला समर्पित केले होते. परंतु अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस मध्ये आल्यावर आम्ही आमचे संपूर्ण जीवन त्या परमेश्वराला अर्पण केले असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला प्रशांत जी जबलपूर, अजित एल चंद्रपूर, लक्की एल मुंबई, चंद्रपूर व नागपूर विभागाचे जी. एस. ओ. सतीश के, मोहन ए, दिनेश ए, मार्मिक डब्लु, प्रमोद बी हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेणारे नम्रता समूहाचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!