अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन रेंजर कॉलेज, चंद्रपूर येथे संपन्न…

642

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर)

चंद्रपूर: नम्रता समूह बागला कॉन्व्हेन्ट, बागला चौक, चंद्रपूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसचे तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन 11 डिसेंबर रोजी रेंजर कॉलेज, चंद्रपूर येथे संपन्न झाले. या तीन दिवसीय समारोपीय कार्यक्रमाला लाभलेले विशेष अतिथी नागपूर चंद्रपूर विभागाचे जी एस ओ श्री.सतीश के यांनी बिल डबल्यू यांच्या प्रापर डे निमित्याने बिल डब्ल्यू यांचे बालपण ते त्यांचा अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमसचा संघर्ष व त्यांचा मृत्यू या साऱ्या गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.

अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस मध्ये आलेली क्रांती, बिग बुक लिहितांना त्यांच्या वाटेला आलेला एक कटु अनुभव त्यांनी आपल्या अनुभवातून कथन केला. तसेच श्री विनोद डबल्यु यांनी आपल्या मद्यसक्त जीवनाचे अनुभव मांडताना दारूमुळे होणारे आजार या विषयावर प्रकाश टाकण्याचे प्रयत्न केले. मिसेस डब्ल्यु यांनी स्वतःचे अनुभव कथन व्यक्त करीत कार्यक्रमाला भावनिक वळण दिले.

प्रशांत भाई जबलपूर यांनी व्यक्त होताना दारू पिण्याचा काळात स्वतःच्या मुलाचे बालपण सुद्धा बघितले नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. वेस्ट बंगाल इथून आलेले सुशांत जी यांनी सुद्धा आपले मत व्यक्त करीत दारूमुळे होणारे आजार व परिवारावर होणारे आजार ह्या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस चा हा प्रसार अनेक मध्यपी पर्यंत पोहचविण्याचे कार्य प्रसार माध्यमांनी केले आहे असे उपस्थित मार्गदर्शक यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला यशस्वी भूमिका निभावणारे नम्रता समूहाचे चेअरमन व सर्व सदस्य उपस्थित होते. अश्या प्रकारे या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाची सांगता करण्यात आली..