Advertisements
Home नागपूर बार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु

बार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु

दिनेश मंडपे
कार्यकारी संपादक

Advertisements

नागपुर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे मा. धम्मज्योती गजभिये,महासंचालक,बार्टी,पुणे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व नागरिकांसाठी मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली.
सदर मदत केंद्राचे रीतसर उद्घाटन मा. सुकेशीनी तेलगोटे (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण,नागपुर),मा. आशा कवाडे ( संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नागपुर) व मा. रितेश गोंडाने ( कार्यालयीन अधीक्षक बार्टी पुणे तथा समनव्यक बार्टी नागपूर) यांच्या हस्ते करण्यात आले.
सर्वसामान्य नागरिकांना व विद्यार्थ्यांना बार्टी,सामाजिक न्याय विभाग तसेच जात प्रमाणपत्र यासंदर्भात माहिती देणे तसेच येणाऱ्या अडचणी सोडवणे हा या मदत केंद्राचा उद्देश असून जास्तीत जास्त गरजू लोकांनी बार्टी कार्यालयास भेट देऊन आपल्या समस्या मदत केंद्रात मांडल्या पाहिजेत असे आव्हान देखील याप्रसंगी मा. रितेश गोंडाने यांनी केले.
बार्टीच्या या आगळ्यावेगळ्या लोकउपयोगी उपक्रमाचे कौतुक करताना मा. सुकेशीनी तेलगोटे यांनी मदत केंद्राच्या ठिकाणी एक सजेशन बॉक्स ठेवावा व येणाऱ्या लोकांच्या समस्या जाणून त्यांची मदत करावी असे सांगितले सोबतच हा उपक्रम अतिशय प्रेरणादायी असून या उपक्रमाबाबत त्यांनी मा. महासंचालक धम्मज्योती गजभिये यांचे आभार देखील मानले.
याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तुषार सूर्यवंशी (प्रकल्प अधिकारी ) तर आभार कु.शीतल गडलिंग (प्रकल्प अधिकारी) यांनी मानले.कार्यक्रमाकरिता ज्योती करवाडे ( प्रकल्प अधिकारी),हृदय गोडबोले (प्रकल्प अधिकारी),प्रीती दुरुगकर (उपलेखापाल),श्री नागेश वाहुरवाघ (प्रकल्प समन्वयक) ,सुनील काकडे व बार्टी नागपूर मधील समतादूत व विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते..

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील शिक्षकाकडूनच अवयवदान

नागपूर: उद्याचे आदर्श नागरिक घडवित असताना एका शिक्षकाने मरणानंतरही अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. सुरुवातीला करोना व त्यानंतर विविध कारणाने मूत्रपिंड उपलब्ध न झाल्याने वणीतील...

‘वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा’ हे पुस्तक मलेशिया येथे प्रकाशित होणार

नागपूर : 'वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा' हे जयंत साठे लिखित समीक्षणात्मक पुस्तक असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तीन फेब्रुवारी 2023 रोजी मलेशिया येथील आंबेडकरवादी...

प्रचंड मेहनत हेच यशाचे सूत्र – श्री लीलाधर पाटील 

दिनेश मंडपे कार्यकारी संपादक नागपुर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर मार्फत मा. धम्मज्योती गजभिये (महासंचालक बार्टी पुणे) यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता ठेमस्कर

घुग्घूस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे सौ. पदमा राजूरेड्डी यांच्या वतीने हळदी - कुंकू व वाण वाटप कार्यक्रम 28 जानेवारी रोजी...

व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक) चंद्रपूर- अँलअँनाॅन परिवार समुह या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या "सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह चंद्रपूर येथे स्थापन होऊन चार वर्ष पूर्ण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!