Home चंद्रपूर स्थानिक बेरोजगारांना न्याय कधी? खोटे आश्वासन देऊन केली WCL ने फसवणूक…

स्थानिक बेरोजगारांना न्याय कधी? खोटे आश्वासन देऊन केली WCL ने फसवणूक…

650

प्रलय म्हशाखेत्री (जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर)

चंद्रपूर: लगतच येत असलेल्या सिनाळा या गावाच्या जमिनीखाली खाली कोळसा आढळल्याने WCL ने त्यांचे पुनर्वसन करण्याचे ठरविले. पुनर्वसन करताना स्थानिक बेरोजगारांना आश्वासन देण्यात आले की, डब्लू सी एल क्षेत्रात येणाऱ्या खासगी कम्पनीमध्ये आम्ही तुम्हाला रोजगारात प्रथम प्राधान्य देऊ असे त्यांनी वेळोवेळी सांगून सामान्य लोकांची फसवणूक केली..

आज जवळजवळ गाव पुर्नवसन झालेला आहे मात्र बेरोजगारांना अद्यापही कुठल्याही खासगी क्षेत्रात त्यांना नौकरी दिली नाही. एवढंच नाही तर नवीन सिनाळा गावलगतच येणाऱ्या ठिकाणी एक खासगी कम्पनी(गौरव इंडस्ट्रीज) स्थित झाली,मात्र त्यातही काही राजकीय नेत्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनाचं नौकरी दिल्याचे बघून येते.

नौकरी वर लागायचे झाले की नेत्यांची चमचेगिरी करून लागावं की काय? हाच प्रश्न सध्या स्थानिक बेरोजगारांना भेडसावत आहे. लवकरात लवकर स्थानिकांना रोजगार मिळाला नाही तर पूर्ण गावं एकवटून कायदा हातात घेऊन कम्पनी चे कामकाज बंद पाडू अश्या पद्धतीचे वक्तव्य स्थानिक लोकांकडून ऐकण्यात आले आहे..

Don`t copy text!