बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील पुलाच्या अपघाताला रेल्वे अधिकारी व येथील मंत्री जबाबदार – वंचित बहुजन आघाडी

510

प्रलय म्हशाखेत्री (जिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर)

चंद्रपूर: बल्लारपूर रेल्वेस्टेशन वरील पादचारी पुलाला भगदाड पडून त्यातून प्रवासी खाली रेल्वे रुळावर कोसळण्याची धक्कादायक घटना बल्लारपूर येथे रविवारी सायंकाळी घडली. या घटनेत एक प्रवासी ठार तर 21 प्रवासी जखमी झाले दोघांची प्रकृती गंभीर आहे.

मोरबीतील पूल कोसळण्याच्या घटनेतून देश अद्याप सावरलेला नसताना पुलाला बगदाद पडल्याने मोठा अपघात झाला असून रेल्वेच्या चुकीच्या नियोजनामुळे हा अपघात घडला असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पुणेकर यांनी केला.

मध्य रेल्वेतील बल्लारशा रेल्वे स्थानक हे भारतातील जंक्शन म्हणून ओळखले जाते. या रेल्वे स्थानकावरील पादचाऱ्यांना ये-जा करण्याकरिता तयार केलेला पुलाची मागील अनेक वर्षापासून देखभाल व दुरुस्ती केली नाही. येथील आजी-माजी मंत्रांनी व रेल्वे अधिकाऱ्यांनी निव्वळ दिखावा करण्याकरिता रंगरंगोटी करून भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानकाचा मान मिळवला होता. परंतु ज्या मूलभूत गोष्टीकडे लक्ष देऊन देखभाल व दुरुस्ती करायची होती ती केली नाही आणि अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षणामुळे व चुकीमुळे आज गंभीर हानी झाली व रेल्वेच्या पूल कोसळला आणि यामध्ये एका महिलांच्या मृत्यू झाला व अनेक लोक मृत्यूची झुंज देत आहे.

या क्षेत्रातील आजी-माजी पालकमंत्री, रेल्वे अधिकारी यांनी देखावा दाखवण्याचे काम करून शासनाच्या करोडो रुपयांच्या निधीच्या गैरवापर केला परंतु पुलाचे साधे इन्स्पेक्शन सुद्धा केले नाही. त्यामुळे एवढा मोठा अनर्थ घडला रेल्वे अधिकाऱ्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी व उच्चस्तरीय समिती नेमून या सगळ्या प्रकरणाचे सखोल चौकशी करण्यात यावी व मृत्यू पावलेला व्यक्तींना, जखमी व्यक्तींना तात्काळ आर्थिक भरपाई देण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सिद्धांत पुणेकर यांनी जिल्हाधिकारी द्वारे प्रशासनाला केली.

निवेदन देताना यावेळी उपस्थित अक्षय लोहकरे, अभिषेक लाकडे, संतोष कुडमेथे, तेजराज भगत आदी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.