प्रितम गग्गुरी(उपसंपादक)
गडचिरोली:- ग्लोबल स्काॅलरश फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्य स्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी व्यक्तीना जिल्हा भूषण पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला.
जिल्हा भूषण पुरस्कार सत्कार सोहळा दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोजी अण्णा भाऊ साठे सभागृह पुणे येथे ग्लोबल फाऊंडेशन स्काॅलरश पुणे च्या वतीने पद्मश्री मा.पोपटराव पवार यांच्या हस्ते चाणक्य अकॅडमी अहेरी व आलापल्ली चे संचालक मा.जुगल एस.बोम्मनवार यांना गडचिरोली जिल्हा भूषण पुरस्कार 2022 देऊन सन्मान करण्यात आले.
प्रा. जुगल बोम्मनवार हे दक्षिण गडचिरोली भागात शैक्षणिक क्षेत्रात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यात उल्लेखनीय काम करीत असल्याबाबत त्याना गडचिरोली भूषण पुरस्कार 2022 सन्मानित देऊन करण्यात आले.






