Homeचंद्रपूरमूलस्वच्छता मित्रांकडून सोमनाथ देवस्थानाची स्वच्छता

स्वच्छता मित्रांकडून सोमनाथ देवस्थानाची स्वच्छता

शुभम जुमडे तालुका शहर प्रतिनिधी

मूल: धबधब्यातून वाहणारा पाण्याचा प्रवाह नेहमीच सुरू राहावा, यासाठी मूल येथील स्वच्छता मित्रांकडून सोमनाथ परिसराची स्वच्छता केली जात आहे. दरम्यान यावर्षी धबधब्यातील पाण्याचा प्रवाह अखंड सुरूच आहे, हे विशेष. मूल तालुक्यातील सोमनाथ येथे भगवान महादेवाचे पुरातन मंदिर आहे.

निसर्गरम्य वातावरणात या ठिकाणी छोटेसे मंदिर मंदिराच्या मागील भागात झाडे आणि बाराही महिने वाहणारा धबधबा पर्यटकांचे आकर्षण आहे. जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटक पावसाळा व हिवाळ्यात निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोमनाथ येथे देवस्थानाला भेट देण्यासाठी येत असतात.

देवस्थानापासून अवघ्या दोन किमी अंतरावर स्वर्गीय बाबा आमटे यांचा सोमनाथ प्रकल्प आहे त्या ठिकाणी सुद्धा बाबांचे विचार घेण्यासाठी नागरिक भेट देत असतात ,आपल्या जन्मभूमीची आठवण सदैव मनात ठेवून सामाजिक क्षेत्रात काम करणारे गौरव गोपीचंद शामकुले सामाजिक बांधिलकी जोपासत सोमनाथ मंदिर परिसराची स्वच्छता करीत असतात.

मूल तालुक्यात विविध ठिकाणी जाऊन स्वच्छता मित्रा टीम स्वच्छता अभियान राबवत असतात. स्मशाभूमी, विसर्जन घाट ,कॉलेज ग्राउंड ,पान्याचे वाल ,अस्वच्छता तिथे स्वच्छता करण्यासाठी टीम सातत्याने रोज दोन तास पाच वर्ष म्हणत श्रमदानातून स्वच्छता करीत आहे, स्वच्छता टीम मध्ये बबलू गेडाम, स्वप्निल आक्केवार, प्रतीक मुरकुटे, प्रणय दागमवार सदस्य निस्वार्थ पर्यावरणाची सेवा करीत आहेत.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!