वरूर रोड येथील वाचनालयातील विद्यार्थ्यांनी साजरा केला भारतीय संविधान दिवस

592

राजुरा: तालुक्यातील जगतगुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात संविधान दिवस साजरा केला. भारतीय संविधान व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावातील विद्यार्थी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.त्यानंतर बौद्ध विहार मंडळ, वरुर रोड येथे संविधान दिन साजरा केला.

मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. विशाल शेंडे यांनी प्रस्ताविकेचे वाचन केले. यावेळी वनिता लाटेलवार, विकास कोतपल्लीवार,विशाल शेंडे, बोलीवार यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. समीक्षा मोडक,श्रुती बोरकर, समीक्षा जीवतोडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात गावातील नवनिर्वाचित सरपंच गणपतजी पंधरे, उपसरपंच विजया करमनकर, नवनिर्वाचित सदस्य मारोती पुसाम, सुनील चोथले, विद्या टेकाम, मंगला गौरकार, श्रीदेवी कुळमेथे, विकास कोतपल्लीवर,सौ. बोलीवार, मोरेश्वर धानोरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वप्नील जीवतोडे, प्रवीण चौधरी, सागर बोरकर,साहिल मडावी, मयूर जानवे, प्रज्वल बोरकर आदी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण चौधरी तर आभार गणेश करमनकर यांनी मानले.