Homeचंद्रपूरबल्लारपूरब्रेकिंग: बल्लारपूर रेल्वेब्रीज कोसळला; अनेकजण गंभीर जखमी...

ब्रेकिंग: बल्लारपूर रेल्वेब्रीज कोसळला; अनेकजण गंभीर जखमी…

चंद्रपूर : जिल्यातील मोठे जंक्शन रेल्वे स्टेशन म्हणून ओळख असलेल्या बल्लारपूर रेल्वे स्टेशनवरील पुल अचानक कोसळल्याने 8 ते 10 प्रवासी जखमी झाल्याची घटना आज घडली.

हा अपघात इतका भयंकर होता की कोसळलेल्या काही जणांचा रेल्वेच्या 2500 केव्हीं इलेक्ट्रिक लाईनला स्पर्श झाल्याने ते प्रवासी गंभीररित्या भाजल्या गेले असून उंचावरून कोसळल्याने सर्व प्रवसी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन कामाला लागले असुन घटना कळताच स्थानकावर रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या आहे.

वृत्त लिहिस्तोवर कुठलीही प्राणहानी झाल्याची माहिती मिळाली नसून जखमींचा संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जखमींना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!