राजुऱ्यात विजयादशमी उत्साहात साजरी : वाईट प्रवृत्तीचे दहण
सहसंपादक श्याम मशाखेत्री
राजुरा येथे भवानी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने विजयादशमी निमित्ताने वाईट प्रवृत्तीचे दहण करून सत्प्रवृत्तीची जोपासण्याची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवण्याच्या संकल्पासह रावण दहण करण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, माजी आमदार ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, माजी आमदार ॲड. संजयभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, माजी नगराध्यक्ष स्वामीजी येरोलवार, माजी उपनगराध्यक्ष सुनीलभाऊ देशपांडे, विकासराव बोनगीरवार, सतीशभाऊ धोटे, अरूणभाऊ मस्की यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आवर्जून उपस्थित होते. यावेळी मुस्लिम समाज राजुराच्या वतीने मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन विजयादशमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या हे विशेष तर उपस्थित सर्व नागरिकांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या.