राजुरा: आज शहरातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, राजुरा येथे संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये पालक शिक्षक सभा व प्रथम सत्रांत परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन करण्यात आली.
पी. एन. वैरागडे यांनी प्रास्ताविकेतून संविधान निर्मिती कशी झाली याबद्दल तर आर. के. डाहुले यांनी संविधानातून लोकशाही कशाप्रकारे बळकट झाली याबद्दल विचार व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतातून विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांनी संविधान हे अधिकार व कर्तव्य याची जाणीव करुन देणारे प्रभावी माध्यम असून सर्वांनी संविधानाच्या तत्वाचे पालन केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
प्रथम सत्रांत परीक्षेचा निकाल परीक्षा प्रमुख श्री. चिडे व श्री. वैरागडे यांनी जाहीर केला. पालक शिक्षक सभेला अनेक पालक व माता पालकांची उपस्थिती होती. अशा या त्रिवेणी कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील, पर्यवेक्षिका स्मिता धोटे, शिक्षक चिडे, श्रीमती उरकुडे, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष दूमने, पहानपटे, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन एम. पी. मेश्राम यांनी तर आभारप्रदर्शन एल. टी. मडावी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता “भारतीय घटनेचा तु शिल्पकार आहे” या गीताने करण्यात आली.