Homeचंद्रपूरराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संविधान दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे संविधान दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न…

-श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर)

चंद्रपूर: राहुल देवतळे शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर यांच्या वतीने दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाच्या निमित्ताने स्थानिक विठ्ठल मंदिर वॉर्ड गोपाल पुरी चौक इथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली.

संविधान दिनाच्या निमित्ताने राहुल भाऊ देवतळे यांनी प्रभागात फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर दि. 27 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पठाणपुरा गेट इथून पदयात्रा काढण्यात येणार व ही पदयात्रा तीस दिवसाची असेल असा आशावाद श्री राहुल भाऊ देवतळे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला राजीव ककड शहर जिल्हा अध्यक्ष, सुनील काळे विधानसभा अध्यक्ष, पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष श्री दीपक जयस्वाल, शशिकांत देशकर, राजू नगरकर, प्रतिभा ताई खडसे, सौ.आशाताई बावणे, सौ.कल्पना ताई पडगेलवार आणि वॉर्डातील असंख्य महिला पुरुष यांची उपस्थित होते. तसेच राहुल भाऊ देवतळे यांना शुभेच्छा देत वॉर्डातील महिला व पुरुष यांनी पदयात्रेला समर्थन दिले…

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!