Homeअहेरीअम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न....

अम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न….

प्रितम गग्गुरी(जिल्हा प्रतिनिधी)

आल्लापल्ली: राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय, आलापल्ली येथे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव महाराज अध्यक्ष धर्मराव शिक्षण मंडळ अहेरी, माजी राज्यमंत्री वने व आदिवासी विकास विभाग यांच्या वाढदिवसानिमित्त आणि सोबतच डॉ.ए.पी.जी.अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

हे शिबीर डॉ.मारोती ऊध्दवराव टिपले प्राचार्य राजे धर्मराव कला वाणिज्य महाविद्यालय आलापल्ली यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले. त्यात उपजिल्हा रुग्णालयात अहेरी ची टिम डॉ.कन्ना मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली हजर होती.

या प्रसंगी १९ रक्तदात्यांनी रक्तदान करून हे शिबिर यशस्वी केले. याप्रसंगी प्रा. दया मेश्राम, डॉ.आर.डब्लू. सूर, श्री.विनोद चुके, ए. सी. आत्राम, एन.एम.कूडमेथे, आर.एस.आत्राम, व्हि.के.विडपी, प्रीती राना, पी.आर.सेडमाके, डी.डी.मटामी, ए.बि. मंडल, पी.ए.विकोडे, ए. एस. मडावी, एन.एम.नागपूरवार, के.बी.भंजन, सत्यनारायण पोरटे, आर.एल.रामगीरकर, एम.एस.कोडापे आणि श्री.पि.व्ही.तलांडे यांनी रक्तदान केले.

यावेळी १५० विद्यार्थ्यांनी आरोग्य व रक्त गट तपासणी करून घेतली. सदर आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीरासाठी उपजिल्हा रुग्णालय, अहेरी येथील डॉ. तेजस्विनी मूंडरे, सरिता वाघ, निखिल कोन्डापर्ती, वेंकटेश दिकोंडा, लॅब तंत्रज्ञ हेमराज शेख, अर्चना आत्राम, श्रेया मडावी,राजेश्वरी कोटा,वनश्री बोरकर तर महाविद्यालयातील डॉ. आर.डब्लू.सूर, डॉ. एन.टि.खोब्रागडे, डॉ.आर. एन.कूबडे, प्रा. डि.टी.डोंगरे,प्रा.डि.आर.मेश्राम,प्रा.उत्तम गावडे प्रा.प्रतिमा सूर्यवंशी, प्रा.अरूणा वाघाडे, प्रा.जयपाल कोंडागूर्ले आणि प्रा.एच.के.राजूरकर, प्रा. रवी ढवळे, प्रा.सोनाली गंप्पावार, प्रा.अर्चना मद्दीवार, प्रा. आर.एन.नन्नावरे, प्रा.अर्चना घसगंटिवार, प्रा. गायत्री कूमरे व श्री. हूशांत वासेकर, श्री देवाडकर, एन.सि. सि ब्लड ग्रुप चे अध्यक्ष तिरुपती गडमवारआणि समस्त विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आर.डब्लू.सूर यांनी केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!