Homeचंद्रपूरजिवतीमहागाईमुळे यंदा गरिबांची दिवाळी अंधारात...सरकारने महागाईवर नियत्रंण आणणे गरजेचे...

महागाईमुळे यंदा गरिबांची दिवाळी अंधारात…सरकारने महागाईवर नियत्रंण आणणे गरजेचे…

बळीराम काळे,जिवती

जिवती : (ता. प्र.) तालुक्यातील सर्वसाधारण नागरीक अतिृष्टीच्या विळख्यात सापडले असल्यामुळे,कापसाचे सिजन हे अतिृष्टीमुळे लांबणीवर गेले असून,त्यांना कापुस वेळेवर आला नसल्याने,अशातच ओढवलेल्या या संकटामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या साऱ्या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फिरवले आहे.पाऊस काय थांबत नसल्याने,
शेतकऱ्यांला उत्पन्नचे साधन दिसणारी पिके आता सडू लागली आहेत. शेतकऱ्याची उत्पन्नाचे साधने आता शेवटची घटीका मोजताना दिसत आहेत. कापसाच्या वाती,सोयाबीनची माती झाली आहे.सोयाबीन गेले जागीच सडून,ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची ढीग लावला होता अशा ढिगाऱ्यात कोंब फुटलेले पाव्हायास मिळत आहे.कापुस वेचणीला असल्याने परतीच्या सततच्या पावसाने कापसाला कोंब फुटण्याची वेळ आली आहे. दिवाळी सारखा सन हा वर्षातून एकदा येत असतो.पण दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांनच्याकडे पाहिजे तसा पैसा नाही.
दिवसेंदिवस महागाई सातत्याने वाढत चालली आहे. प्रत्येक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून येते आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा खाद्यतेलासह दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती बऱ्याचपैकी वाढल्या आहेत.त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीच्या किराणासह अन्य कोणतेही साहित्य पाच ते दहा हजार रुपयांनी महागत जाईल अशी स्थिती आहे.
खाद्यतेलाचे दर मागील काही दिवसांपासून दुप्ट्टीने वाढले आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागिकांसाठी उदरनिर्वह करतांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे.
काही दिवसांपुर्वी खाद्य तेलाचे भाव कमी झाले होते.
मात्र दोन ते तीन दिवसातच पुन्हा दर वाढले.कोरोनाकाळ संपल्यानंतर महागाई कमी होइल,सामान्य नागरिकांना वाटत होते.परंतु तसे झाले नाही.ही महागाई वाढतच राहिली.पेट्रोल,डिझेलचे दर,ज्याप्रमाणे वाढले,त्याचप्रमाणे घरगुती गॅसच्या किंमतीने तर बरीच उंचाई गाठली आहे.
यापासून खाद्यतेल, चणा डाळ,तसेच दैनिदीन गरजेच्या वस्तू सुद्धा सुटल्या नाहीत.तरी पण आता तर दिवाळी आईन तोंडावर येऊन ठेपली असून,महागाईने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे.
म्हणून सर्वसाधारण नागरिकांना महागाईच्या काळात दिवाळी साजरी करणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखी बाब आहे.नागरीक दिवाळी साजरी करण्यासाठी पैसा नाही म्हणून, पालकांना आपल्या मनात येत आहे.की,मुलांना त्यांच्या मते त्यांना फटाके,
झाड,फुल,आवडीचे कपडे,इत्यादी साहित्य दीवाळी सारखा मोठ्या सणाला घेऊन देऊ शकत नाही.
अशा विविंचनेत आपली दिवाळी साजरी न होता अंधारात गडप होइल का? अशी स्थिती महागाईच्या काळात नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!