Home चंद्रपूर आम आदमी शेतकरी संघटनेच्या विदर्भ (पूर्व)-संपर्क प्रमुख पदी सुनील रत्नाकर भोयर यांची...

आम आदमी शेतकरी संघटनेच्या विदर्भ (पूर्व)-संपर्क प्रमुख पदी सुनील रत्नाकर भोयर यांची निवड…

965

श्याम म्हशाखेत्री चंद्रपुर जिल्हा संपादक

चंद्रपुर: आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या च्या पुण्यात झालेल्या मिटिंग मध्ये २१ जून २०२२ ला आम आदमी शेतकरी संघटने ची स्थापना करण्यात आली.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून श्री बिपीन पाटील यांची निवड करण्यात आली होती. पूर्व विदर्भातील नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर या भागात आम आदमी शेतकरी संघटनेची व्याप्ती वाढावी,विदर्भातील शेतकरी अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत त्यामुळं विदर्भात सुद्धा अनेक आत्महत्या होत आहेत.

आम आदमी शेतकरी संघटना आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शेतीनिष्ठ उद्योग व्यवसाय करण्याच्या उद्देशाने शेतकरी पुत्रांना ट्रेंनिग देणे, चांगला शेतमाल पिकवून त्या शेतमालाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे,शासनाच्या विविध प्रकारच्या योजना गावा गावांत राबविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे अशा पध्दतीने आम आदमी शेतकरी संघटना काम करणार आहे.

यासाठी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी तर्फे विदर्भातील (पूर्व)-नागपूर,वर्धा,भंडारा,गोंदिया, गडचिरोली व चंद्रपुर – या जिल्ह्या साठी -संपर्क प्रमुख म्हणून श्री सुनील रत्नाकर भोयर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

Don`t copy text!