नागपूर :- सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या नागपूर विभागातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचारी मागील तीन महिण्यापासून अनुदाना अभावी वेतनापासून वंचित असून याची दखल समाज कल्याण विभाग घेण्यास तयार नाही. त्यांनी साधी अनुदानाची मागणी सुद्धा अद्याप पर्यंत वरीष्ठ कार्यालयात केलेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात होण्याची चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झालेला दिसत असून समाज कल्याण विभागाने तात्काळ अनुदानाची मागणी करून दिवाळी पूर्वी वेतन करण्याबाबत मागणी होत आहे.
नागपूर विभागातील समाजकार्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात
RELATED ARTICLES