तालुक्यातील बरेचसे पशुधन लंम्पी या आजाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र…#बाधित क्षेत्रातील २६ गावातील ६९०४ पशुधनांवर लसीकरण

394

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.) तालुक्यात लम्पी या संसर्गजन्य आजारांने जिवती तालुक्यातही आपले पाय पसरविले आहे,त्यामुळे जिवती, शेणगाव व येल्लापुर या गावापासून पाच किलमीटरवर त्रिजेचा परीसर सतर्कता क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आला आहे.

जिवती परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात गडपांढरवनी, असापुर,नागापूर,धोंडार्जूनी,दंपुरमोहादा, घारपाना, मरकलमेटा, रोडगुडा, देवलागुडा,मौजा शेंणगाव परिसरातील पल्लेझरी, माथाडी, सलिमनगर, मरकागोंदी,हिरापुर, टेकार्जूनी, धोंडामांडवा, घनपठार, हटकरगुडा,तर मौजा येल्लापूर परिसरातील लांबोरी, नारपठार,भूरियेसापूर,टाटाकोहाड, येल्लापूर खुर्द, कमलापुर, मराठगुडा, शेडवाही (लांबोरी)अशी २६ गावे सतर्कता क्षेत्रात आली आहेत.

लंम्पी आजाराचा कोणताही पादूर्भाव वाढू नये म्हणून तालुक्यातील बाधित ठिकाणापासून पाच किलमीटरवर त्रिजेच्या परिसरातील २६ गावातील पशुधनाना लम्पी लसीकरण मोहीम राबवून शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात युद्धस्तरावर पुर्ण करण्यात आले.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.हिरुडकर यांच्या
मार्गद्शनाखाली प्यार फाऊंडेशन व डॉ.प्रकाश सहारे,चंद्रपूर येथील चमु, पशुवैद्यकीय दवाखाना जिवती येथील चमू,डॉ.जगदीश मसराम,डॉ.भूषण मकेश्वर,
डॉ.शीतल वासनिक,राहुल नरवाडे, आर्विंद राठोड,
राम आडे,गणेश शेडमाके आदी उपस्थित होते.