Homeचंद्रपूरसिंधी येथे लंम्पी रोगांवर लसीकरण...

सिंधी येथे लंम्पी रोगांवर लसीकरण…

राकेश कडुकर (राजुरा ग्रामीण प्रतिनिधी)

राजुरा: तालुक्यातील सिंधी येथे बुधवार दिनांक २८/०९/२०२२ला लंम्पी रोगाला पळवण्यासाठी उपसरपंच रामभाऊ ढुमणे आणि पशुसंवर्धन विकास अधिकारी डॉ जल्लेवार साहेब यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली. देशभरात पशुधनावर लंम्पी या संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे पशुपालकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिंधी परिसरात लंम्पी सारख्या संसर्गजन्य आजार आढळला नसला तरी यावर आजारांवर काळजी घेतली पाहिजे यादृष्टीने पशुवैद्यकीय दवाखाना नलफडी येथील डॉ आडे यांनी गावातील सर्व पशुधनावर लसीकरण करून पशुपालकांना उपाय योजना सांगितल्या यावेळी मंगेश रायपल्ले संजय ढुमणे दिलीप ढुमणे मंगेश घुबडे आणि गावातील पशुपालक उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!