Homeचंद्रपूरश्रमदानातून ताडाळी स्मशानभूमी परिसर केला स्वच्छ... सेवाभावी कार्यकर्ता शिवदास शेंडे यांच्या...

श्रमदानातून ताडाळी स्मशानभूमी परिसर केला स्वच्छ… सेवाभावी कार्यकर्ता शिवदास शेंडे यांच्या कार्याचा केला गौरव… श्री गुरुदेव कार्यकर्ता भिसी ग्रुप पडोली परिसरचा सामाजिक उपक्रम…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपुर: “आपण जिथे राहतो तो परिसर, त्या गावातील सार्वजनिक स्थळे,मंदीर परिसर स्वच्छ ठेवणे हे त्या गावातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ही जाणीव प्रत्येक नागरिकांमध्ये झाल्यास या स्वच्छतेवर होणारा शासनाचा कितीतरी खर्च आपण काही प्रमाणात वाचवू शकतो.

घर- परिसर अस्वच्छतेमुळे होणारे कितीतरी आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो .जसे आपण रक्तदान, अन्नदान, करतो तसेच श्रमदान ही आजची आपल्या गावाची सर्वात महत्वाची गरज आहे. यातूनच जी लहान मुले उद्याचा उज्वल भारत घडविणार आहेत त्यांना सेवेचे महत्व कळणार आहे. सामुदायिक श्रमदानातूनच ग्राम आदर्शाकडे नेण्याची सुरुवात होत असते.

स्वच्छतेतून गावाची खूप मोठी सेवा आपल्या प्रत्त्येकाकडून घडू शकते हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून गावागावात पोहोचविण्यासाठी श्रमदान यज्ञाचा हा उपक्रम सुरू केलेला आहे. दिनांक 18सप्टेंबर 2022 रोजी स्मशानभूमी ताडाळी येथे श्रमदान मोहीम राबवण्यात आली.

श्री गुरुदेव कार्यकर्ता भिसी ग्रुप पडोली परिसर यांच्या पुढाकारातून, गुरुदेव सेवा मंडळ ताडाळी, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच प्राध्यापिका डॉ प्रगती नरखेडकर यांचे आवाहनाला प्रतिसाद देत उपस्थित झालेले स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोलीचे विद्यार्थी यांनी सकाळी आठ ते अकरा वाजेपर्यंत वेळ देऊन श्रमदान करून स्मशानभूमी परिसर स्वच्छ केला.

ताडाळी गावामध्ये नियमितपणे ग्रामस्वच्छता करणारे व गावातील सामाजिक कार्यात सेवा देणारे निष्ठावंत गुरुदेव कार्यकर्ते शिवदास पांडुरंग शेंडे यांचा श्री गुरुदेव कार्यकर्ता भिसी ग्रुप द्वारे सपत्नीक सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या दोन्ही उपक्रमाला खुशाल गोहोकार पिंपळगाव,रामदास तावीडे बाखर्डी ता कोरपना, सोनेगाव शाळेचे आदर्श शिक्षक प्रविण नवले सर, श्री गुरुदेव कार्यकर्ता भिसी ग्रुप पडोली परिसर चे सदस्य विजय देरकर ,ईश्वर मासिरकर यशवंतनगर , शंकरजी मुसळे नागाळा ,मधुकर बोबडे गोरजा ता. भद्रावती, शिवदास शेंडे ,वामन आखरे, अशोक लोणारे ताडाळी, शंकर टोंगे, चंपत गोहोकार , नामदेव आस्वलेउर्जाग्राम ,स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार समाजकार्य महाविद्यालय चे विद्यार्थी संकेत जावळे, रोशन ननावरे, लोकेश कुमरे यांचे सहकार्य लाभले.

आज ताडाळी येथे केलेल्या श्रमदानबद्दल व केलेल्या सत्काराबद्दल शिवदास शेंडे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि पुन्हा एक रविवार ताडाळीसाठी द्यावा अशी विनंती केली. या पुढील दिनांक 25 सप्टेंबर2022 चे श्रमदान ग्रुप सदस्य मधुकर बोबडे यांचे गावी गोरजा, ता भद्रावती येथे होणार असल्याचे श्री गुरुदेव कार्यकर्ता ग्रुप सदस्य नामदेव आस्वले यांनी सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!