Homeगोंडपीपरीगोंडपिपरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभारणी बाबत सभा संपन्न...

गोंडपिपरी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभारणी बाबत सभा संपन्न…

शरद कुकुडकार
गोंडपिपरी ग्रामीण प्रतिनिधी

गोंडपीपरी : आज गोंडपिपरी तालुक्यात आणि सर्व विदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभारणी कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. सोबतच २० तारखेच्या राज ठाकरे यांच्या सभेबद्दल विचारमंथन करण्यात आले. कार्यकर्ता कसा असावा? कार्यकर्त्याला कसे चांगले काम करता येईल? याबाबत मार्गदर्शन मनसे जिल्हा उपसचिव प्रकाश भाऊ बोरकर यांनी सभेत केले.

सभेमध्ये मा. प्रकाशभाऊ बोरकर मनसे जिल्हा उपसचिव तसेच मनसे राजुरा विधानसभा अध्यक्ष महालिंग कंथाळे भाऊ , मनसे कोरपना तालुका वाहतूक सेना अध्यक्ष निनाद भाऊ बोरकर व सर्व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच मनसे गोंडपिपरी तालुका अध्यक्ष पदी रंजीत भाऊ धूडसे यांची निवड करण्यात आली आणि हेमंत भाऊ मेश्राम यांची मनसे वाहतूक सेना अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आणि त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!