Homeचंद्रपूरगोंडपिंपरीकाँग्रेस अनु.जाती तालुका अध्यक्ष गौतम झाडेंना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण

काँग्रेस अनु.जाती तालुका अध्यक्ष गौतम झाडेंना जातिवाचक शिवीगाळ व मारहाण

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: तालुक्यातील चेकबोरगाव येथे काल दि.(१० ) शनिवारी काँग्रेस अनु.जाती तालुका अध्यक्ष गौतम झाडे यांना सायंकाळी ७ च्या सुमारास मारहाण झाली त्यात ते जखमी झाले.गौतम झाडे यांच्या तक्रारीवरून चेकबोरगावलवातील आठ जणांवर अट्रॅसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.
तक्रारीनुसार शनिवारी गावात गणपती विसर्जन होते. ग्रामपंचायत जवळ असणाऱ्या आकाश दुर्गे यांच्या पानठेल्याजवळ झाडाखाली सिमेंट बेंच वर सहकाऱ्यांसह गप्पा करत असताना फक्त राजकीय प्रतिस्पर्धी गटाचे असल्याने रागाच्या भरात जातिवाचक शिवीगाळ करत जानकिराम झाडे,जोगेशवर उपासे,नितीन झाडे,गणेश झाडे,सुनील पोरटे,संदीप शेंडे,गंगाराम राऊत,गणेश भोयर ,संजय कोमावार यांनी मारहाण केली .रात्री गौतम झाडे यांच्या तक्रारिवरून आठ जणांवर १४३,१०९,३२३,५०४,५०६ ipc सहकलम (१)(त)अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत अट्रॅसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.संजय कोमावार यांच्यावर मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.पोलीस उपविभागीय अधिकारी एम.इंगळे गोंडपिपरी येऊन घटना जाणून घेतली .पुढील तपास उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जीवन राजगुरू,पीएसआय धर्मराज पटले करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!