Homeचंद्रपूरअतिवृष्टीत नागरिकांनी काळजी घ्यावी, जिल्हा प्रशासनाच्या सूचना....

अतिवृष्टीत नागरिकांनी काळजी घ्यावी, जिल्हा प्रशासनाच्या सूचना….

प्रलय म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)

चंद्रपूर :- संततधार पावसामुळे वैनगंगा व वर्धा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच चंद्रपूर जिल्ह्या त सतत होत असलेल्याा पावसामुळे वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द प्रकल्प, वर्धा नदीवरील अप्पर वर्धा प्रकल्प व निम्न वर्धा प्रकल्प आणि बेंबळा नदीवरील बेंबळा प्रकल्पग या धरणांमधून अधिकचे विसर्ग प्रवाहीत करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे पाण्याचा येवा वाढल्यास धरणातून विसर्ग पुन्हा वाढविण्याची शक्यता आहे. परिणामी जिल्हयात वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, या नद्यांकाठी पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या हवामान विभागाने दिलेला पावसाचा ऑरेंज व यलो अलर्ट, #Oranges #Yellow #Alert वैनगंगा व वर्धा नदीच्या पाण्याची वाढती पातळी व नैसर्गिक वीज पडून होणारी जिवीत व वित्तन हानी टाळणेकरीता पुढीलप्रमाणे दक्षता घेण्याबाबत प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्याात येत आहे

कोणत्याही परिस्थितीत पुराच्या पाण्यात प्रवेश करू नका. नदीपात्राच्या कडेला अथवा धोक्याच्या ठिकाणी वास्तव्यास असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हा. मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका. जुन्या मोडकळीस आलेल्या घरात / इमारतीत आश्रय घेऊ नका. नदी नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. धोकादायक ठिकाणी अथवा दरड कोसळणा-या ठिकाणी थांबू नका.
वादळ वारा/विजा चमकत असल्यास घरात असताना काय करावे : घराच्या खिडक्याी व दरवाजे बंद ठेवा. घराचे दरवाजे खिडक्या‍, कुंपण पासून दुर रहावे. मेघगर्जना झाल्यापासून 30 मिनिट घरातच रहावे. घराबाहेर असल्याास त्वचरित सुरक्षित निवा-याच्यां ठिकाणाकडे प्रस्थापन करावे. ट्रकटर्स, शेतीची अवजारे, मोटरसायकल, सायकल यांच्या पासून दुर रहा. गाडी चालवत असल्याास सुरक्षित स्थ‍ळी जाण्याीचा प्रयत्न, करा व गाडी सुरक्षित ठिकाणी लावताना मोठ्या झाडांपासून दूर लावा. खुल्या ठिकाणांपेक्षा सामान्यथतः खिडक्याा बंद असलेल्यार, धातू पासून तयार झालेली वाहने (बस, मोटार) चांगली आश्रयस्थठळे होऊ शकतात. उघड्यावर असल्याबस, शेवटचा पर्याय म्ह णून लगेच गुडघ्यासवर बसून हाताने आपले कान, झाकावे व आपले डोके दोन्हीळ गुडघ्यांरच्याअ मध्येय झाकावे. जमिनीशी कमीत कमी संपर्क असावा. जंगलामध्येह दाट लहान झाडांखाली, उताराच्यान जागेवर निवारा घ्याावा. इतर खुल्याी जागेवरः दरीसारख्या खोल जागेवर जाण्यााचा प्रयत्न, करा. (परंतु अचानक येणा-या पूरापासून सावध रहा.)
जर जमिनीच्याय वर पाणी असल्याूस ताबडतोब सुरक्षित निवारा शोधून काढा.
वादळ वारा/विजा चमकत असल्याूस घरात असताना काय करू नये : गडगडाटीचे वादळ आल्याुस, उंच जागांवर, टेकडीवर, मोकळ्या जागांवर, समुद किनारी, स्वआतंत्र झाडे, रेल्वेा/बस/सहलीची आश्रय स्थाजने, दळणवळणाची टॉवर्स, ध्वडजांचे खांब, विद्युत/दिव्यांलचे खांब, धातुंचे कुंपण, उघडी वाहने आणि पाणी इत्या दी टाळावे. घरात असल्याडस वायरद्वारे जोडले गेलेले फोन/मोबाईल व इतर इलेक्ट्राानिक/इलेक्ट्री कल उपकरणे विद्युत जोडणीस लावु नये. (अशा आपातकालीन वेळी कॉर्डलेस व वासरलेस फोनचा वापर करावा परंतू ते भिंतीला जोडलेले नसावे.) गडगडीच्याप वादळादरम्यासन व विजा चमकतांना कोणत्याूही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. या दरम्या न आंघोळ करणे, हात धुणे, भांडी धुणे, कपडे धुणे ही कार्ये करू नयेत. कांक्रिटच्या् (ठोस) जमिनीवर झोपू नये किंवा उभे राहु नये. प्रवाहकीय पृष्टेभागांशी संपर्क टाळावा. (धातुची दारे, खिडक्यां ची तावदाने, वायरिंग व प्लंयबिंग/नळ) #Heavy #Rainfall
घराबाहेर असल्याेस मेघगर्जनेच्याल वेळी, विजा चमकत असतांना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नका. वाहनांच्याी धातु किंवा विजेच्यात सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. अधांतरी लटकणा-या/लोंबणा-या (Cables) पासून लांब रहा. नदीकिनारी गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे…..

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!