Homeसामाजिक कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसात परतले..प्रकल्प वासियांकडून उत्साहात स्वागत

कर्करोगावर मात करून डॉक्टर प्रकाश आमटे हेमलकसात परतले..प्रकल्प वासियांकडून उत्साहात स्वागत

हेमलकसा:- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम हेमलकसाचे आदिवासी उत्थानासाठी उभारलेल्या लोक बिरादरी प्रकल्पाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश आमटे तीन महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर प्रकल्पात परतले.

यावेळी बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यंदाच्या जून महिन्यात पुणे प्रवासादरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

चाचण्यादरम्यान त्यांना कर्करोगाचे निष्पन्न झाल्यानंतर मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू केले होते. याच दरम्यान उपचार कक्षात फिरत असताना कोसळल्याने त्यांचे हाताच्या हाड देखील मोडले होते. या दोन्ही संकटांवर मात करत डॉक्टर प्रकाश आमटे दीर्घ कालावधीनंतर लोक बिरादरी प्रकल्पात परतताच डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर मंदा आमटे यांचे प्रकल्पातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक लेझीमच्या तालावर जल्लोषात स्वागत केले.

यावेळी 650 विध्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. डॉक्टर प्रकाश यांनी देखील प्रकल्पातील कार्यकर्ते आणि शालेय विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या कठीण समयी प्रकल्प आणि आमटे कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या सर्वांचे आमटे कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले आहेत. डॉक्टर प्रकाश यांना थकवा जाणवत असून काही दिवसात ते आपली दैनंदिनी सुरू करतील अशी माहिती प्रकल्पाच्या वतीने देण्यात आली आहे.

फेसबुक पोस्ट करत व्यक्त केला आनंद

6 जून 2022 ते 6 सप्टेंबर 2022….3 महिन्यांनी…रक्ताच्या कर्करोगावर यशस्वी मात करून…फायनली पोहोचले बाबा स्वतःच्या कर्मभूमी मध्ये लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे आज संध्याकाळी साडेचार वाजता. अतिशय आनंद झाला सर्वांना. शाळेतील विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. आनंदी आनंद गडे…जिकडे तिकडे चोहीकडे…अनुभुती आली… खूप खूप आभार दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे येथील सर्व तज्ञ डॉक्टर्स आणि स्टाफ यांचे. खूप खूप आभार ज्यांनी या अडचणीत मदत केली आणि ज्यांनी खूप खूप शुभेच्छा दिल्या. सध्या थकवा आला आहे प्रवासाचा…अश्यक्तपणा आहे…, अशी पोस्ट करत अनिकेत आमटे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

आदिवासींसाठी महत्वाचं योगदान
आदिवासींना मुख्य प्रवाहात आणावं, त्यांची पिळवणूक थांबावी आणि त्यांना माणूस म्हणून जगण्याची संधी मिळावी डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकसाच्या ‘लोकबिरादरी प्रकल्पा’तून अनेक वर्षे करत आहेत. त्यांच्या या कार्यात त्यांची पत्नी डॉ. मंदाताई देखील सामील झाल्या. आमटे कुटुंबियांची चौथी पीढी या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत. सामाजिक कार्यासाठी ‘रेमन मॅगसेसे’ (Ramon Magsaysay) हा जागतिक पातळीवरचा पुरस्कार डॉ. प्रकाश आमटे यांना देण्यात आला आहे. दुर्गम भागात गेली चार दशकं सुरु असलेल्या नि:स्वार्थ कामाची ही ओळख संस्मरणीय तर ठरतेच पण आबालवृद्धांना प्रेरणाही देते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!