Home चंद्रपूर गोंडपिंपरी सकमुर तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मोहन तांगडे यांची निवड…

सकमुर तंटामुक्त समिती अध्यक्षपदी मोहन तांगडे यांची निवड…

590

सिद्धार्थ दहागावकर
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी

गोंडपिपरी: तालुक्यातील सकमुर गट ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पूर्ण पार पडली. यात मोहन तांगडे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांचा निवडीवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून गावातील तंटे गावात सोडविल्या जातात. तंटामुक्त गाव समितीमुळे पोलीसांचा भार कमी झालेला आहे. दरवर्षी नव्या अध्यक्षांची निवड केली जाते. गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर येथे नुकतेच तमुसचा अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रीया पार पडली. यात मोहन तांगडे यांची निवड करण्यात आली आहे.

Don`t copy text!