Homeचंद्रपूरतान्हा पोळा सणाच्या एकोप्यातून संस्कृतीचे दर्शन- आ.वडेट्टीवार

तान्हा पोळा सणाच्या एकोप्यातून संस्कृतीचे दर्शन- आ.वडेट्टीवार

ब्रम्हपुरी: शहरातील धुम्मनखेडा वार्ड बाजार चौकात १०० वर्षांहुन अधिक जुने असलेले पुरातन महादेव मंदिर आहे. तान्हापोळ्याच्या दिवशी ब्रम्हपुरी शहरातील विविध वार्डातील नागरिक मोठ्या आस्थेने या मंदीराभोवती तीन प्रदक्षिणा घालतात. ही परंपरा ७० ते ८० वर्षांपासून कायम आहे. या ठीकाणी शहरातील बालक आपले लाकडी नंदीबैल घेऊन येत असतात. या ठीकाणी शहरातील सर्वात मोठा तान्हा पोळा भरतो.
याठीकाणी भरलेल्या तान्हा पोळ्याच्या कार्यक्रमात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांनी भेट दिली. बालगोपालांच्या आनंदात सहभागी होत यावेळी त्यांनी त्यांना पोळा सणाच्या एकोप्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते असे प्रतिपादन केले.
यावेळी ब्रम्हपुरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, ओबीसी सेलचे अॅड गोविंदराव भेंडारकर, नगरसेवक बाला शुक्ला, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, अनुसूचित जाती सेलचे विधानसभा उपाध्यक्ष मुन्ना रामटेके, अनुसूचित जमाती सेलचे तालुकाध्यक्ष जगदीश आमले, सरपंच उमेश धोटे, नगरसेविका सुनीताताई तिडके, नगरसेविका वनिताताई अलगदेवे, नगरसेविका निलीमाताई सावरकर, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमीत कन्नाके, योगेश मिसार यांसह मोठ्या संख्येने यावेळी नागरिक उपस्थित होते.

बॉक्स -:

ब्रम्हपुरी शहरातील गांधीनगर येथे हनुमान देवस्थान समीतीच्या वतीने तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या तान्हापोळ्यात सहभागी सर्व बालकांना नगरसेवक डॉ नितीन उराडे यांच्या कडून स्कुलबॅगचे वितरण करण्यात आले.
व नंदीबैल सजावट स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
या कार्यक्रमात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार, नगरसेवक डॉ.नितीन उराडे, माजी प्राचार्य देविदास जगनाडे, प्रा.उमेश मिश्रा, नगरसेवक हितेंद्र राऊत, तुळशिदास सपाटे, मिलींद सुपले, पराग गीरी, रवी पवार, राहुल सातपुते यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आमदार विजय वडेट्टीवार यांनीनी उपस्थितांना तान्हा पोळ्याचे महत्व समजावून सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!