Homeचंद्रपूरश्री.बाळकृष्ण मित्र परिवार तर्फे तान्हा पोळा सण साजरा...

श्री.बाळकृष्ण मित्र परिवार तर्फे तान्हा पोळा सण साजरा…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक)

चंद्रपुर: स्थानिक बाळकृष्ण मित्र परिवार विठ्ठल मंदिर वॉर्ड, निंबाळकर वाडी तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हा पोळा व वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे म्हणून दिलीपभाऊ रामेडवार जिल्हा अध्यक्ष म.न.से., ऋषी मोगरे, बालुभाऊ कोटपल्लीवार, अनुप कपूर, संजय दाभाडे, जानकी प्रसाद मिश्रा, प्रशांत भाऊ दानव, डॉ.देवेंद्र अहिर, रितेश भाऊ पडगेलवर, सुबोध जुनारकर, सीमाताई रामेडवार म.न.पा नगरसेविका विठ्ठल मंदिर वॉर्ड हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यामध्ये उत्कृष्ट नंदी सजावट प्रथम क्रमांक मयंक भोसकर, द्वितीय क्रमांक ईशांत निखाडे, तृतीय क्रमांक स्वराज बावणे यांनी पटकावला. तर वेशभूषा स्पर्धा प्रथम क्रमांक खुशी साखरे, द्वितीय क्रमांक दक्ष ठोंबरे, तृतीय क्रमांक रुद्र पांडे यांनी पटकावला. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

विठ्ठल मंदिर वॉर्ड मध्ये कोणतेही सण असो वा कोणतेही कार्यक्रम असो मोठ्या उत्साहात साजरे केल्या जात असते. ही परंपरा खूप जुन्या काळापासून चालत आहे. या कार्यक्रमाला वॉर्डातील हौशी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करीत असते. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!