Homeचंद्रपूरजिवतीवडिलाची पुण्यतिथी साजरी न करता त्यांनी गावात सुरू केले वाचनालय

वडिलाची पुण्यतिथी साजरी न करता त्यांनी गावात सुरू केले वाचनालय

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील पल्लेझरी येथील
बालाजी जाधव यांचे वडील शिवाजी जाधव यांची पुण्यतिथी साजरी न करता त्या खर्चातून बालाजी जाधव यांनी गावात वाचनालय सुरू करून त्याचे उदघाटन केले. समाज परिवर्तन करण्यासाठी वाचनालयाची गरज आहे आणि वाचनालय सुरू केले पाहिजे म्हणून पल्लेझरी येथे शिवाजी नाईक वाचनालय सुरू करून समाजापुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे.
शिवाजी नाईक वाचनालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला साहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल सिंधू पालतिया( साहित्यिक) हे प्रामुख्याने उपस्थित होते त्यांनी वाचनालयाची गरज आहे. वाचन केल्याने माणूस घडतो असे मार्गदर्शन केले. डॉ अंकुश गोतावळे, उपाध्यक्ष, नगर पंचायत, जिवती यांनी वाचनालयास पुस्तके भेट दिली. पांडुरंग जाधव यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन मुलींसाठी शैक्षणीक संस्था सुरू केली आहे असे सांगितले. सुरेश केंद्र यांनी आम्हाला समाजांचा विकास करायचे आहे आम्ही गावोगावी, तांडा वस्ती मध्ये वाचनालय सुरू करू असे आश्वासन दिले. सुदाम राठोड यांनी वाचन करून अधिकारी बना असे सांगितले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश करमठोट, (संचालक दमाळ प्रकाशन) यांनी केले तर आभार बालाजी जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला शंकर जाधव, दता गायकवाड, अशोक जाधव, अशोक राठोड, मंदे सर, पाटील सर, कांबळे, जगदिश, माधव राठोड, सोनू देवकते, बालाजी कांबळे गोर सेनेचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!