बळीराम काळे,जिवती
जिवती : पंचायत समिती जिवती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, आंबेझरी येथे पोळा सणा निमित्याने गुरुवारला शाळेतील विद्यार्थ्यांची बैल सजावट स्पर्धा घेण्यात आली.यात मातीचे बैल, देखावा, बैल सजावट, विद्यार्थ्यांची वेषभुषा व घोषवाक्य असे स्पर्धेचे पैलू ठेवण्यात आले.
या स्पर्धेत अंगणवाडीतील विद्यार्थ्यांपासून तर वर्ग आठवीपर्यंत विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. स्पर्धेकरिता अध्यक्ष म्हणून रामराव राठोड, प्रमुख पाहुणे म्हणून जिजाताई कोटरंगे,आंबेझरी शाळेचे मुख्याध्यापक बंडू राठोड, तर पर्यवेक्षक म्हणून सुनिता तोंडरे व नागनाथ बोरुळे यांनी जबाबदारी पार पाडली. तर स्पर्धेच्या आयोजनाकरीता प्रशांत जांभुळकर व अर्जुन चव्हाण यांनी परिश्रम घेतले. स्पर्धेला बहुतांश पालक व गावकरी उपस्थित होते.