Homeचंद्रपूरसावलीसावली तालुक्यातील धान, कापूस भाजीपाला पिक धोक्यात...

सावली तालुक्यातील धान, कापूस भाजीपाला पिक धोक्यात…

सावली: तालुक्यातील करोली, गेवरा खुर्द, गेवरा बूज, कसरगाव, विहीरगाव, बोरमाळ, चिखली, डोंगरगाव, निफंद्रा, अंतरगाव, निमगाव, व्याहाड खुर्द परिसरातील दाबगाव, थेरगाव, बेलगाव, चीचबोडी, मोखाळा, व्याहाद बूज परिसरातील गावे वाघोली, सामदा, सोणापुर, पेटगाव, नीलसणी, डोणाळा, हरांबा, लोंधोली, साखरी, शिर्शी, पेटगाव, जीबगाव, कवठी, पारडी, सिंदोळा, या परिसरातील धान, सोयाबीन, कापूस शेतीला मोठा पुराचा फटका बसला आहे.

घरांची झालेली पडझड, शेतमजुरांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाले आहे. पाचदा आलेल्या पुराने शेतातील पीक वारंवार पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांच्या हातात पीक येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. महा. सरकारनी पाचव्यांदा आलेल्या पुराचे पाच वेळा पंचनामे करून जास्ती जास्त नुकसान भरपाई द्यावी.

गोविंदा खेळाला राज्य सरकार मान्यता देते त्यांची विमा पॉलिसी दहा लाख, मग शेतकरी विमा काढतो त्याच काय किती विम्याची रक्कम देता शेतकऱ्यांना. गोविंदा आला रे आला या खेळाडूंना दरवर्शी लाखोच्या घरात पैशाचा पाऊस पाडता, मग या काळ्या मातीत घामाने चिंब, अंगाला लागलेली माती, काबाळ कष्ट करून जमिनीशी खेळ खेळणाऱ्या माझ्या बळीराजाला अडचणीत पीक कवच द्या. आणि नियमित पीक कर्ज भरणारा शेतकरी 50,000/- रुपये ची मागील 25 दिवसापासून वाट पाहत आहे.

मायबाप सरकार शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ नका चोळू हक्काचे पैसे देऊन धीर द्या. आजच्या घडीला शेतकऱ्यांनी आपल्या जवळची होती नव्हती संपूर्ण ताकत लाऊन शेती हंगाम केला, परंतु मानव निर्मित धरणामुळे शेतीचे वाटोळे केले. वाढलेल्या महागाईच्या भाडक्याने आधीच बेजार झलेली जनता, शेतकरी, शेतमजूर, हवालदिल झाला आहे. रासायनिक खताचे वाढलेले भाव, महागडी औषधे, फवारणी मजुरी, याचा अंदाज काढला तर आजच्या घडीला शेती करणे परवडत नाही.
शेतकरी आपल्या पिकांचा विमा काढतो परंतु विमा कंपनी तुटपुंजी मदत देतात, शासनाने या परिसरावर अन्यायच करीत आले आहे.

आजची परिस्थिती बघता नुकसान झालेल्या पिकांचे पांचनामे करून हेक्कटरी 75,000/- रुपये जाहीर करून, ओला दुष्काळ, शेतकऱ्यांचे कर्ज माफ, करण्याची गरज आहे. अशी प्रतिक्रिया कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री *खुशाल लोडे,* अंतरगाव येथील युवा काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते श्री *श्रीकांत संगिडवार* यांनी पुरपरिस्थीची पाहणी करून शासनाला, प्रशासनाला मागणी केली आहे. पूर पाहणी करतांना, करोली च्या सरपंच सौ. शीलाताई लोहंबरें, युवा काँग्रेस चे कार्यकर्ते श्री. संजय गेडाम, करोली येथील पोलिस पाटील, श्री. मल्लारी भोइते आणि करोली येथील गावकरी महिला भगिनी, श्री अनिल गेडाम, प्रमोद भंडारे, विनोद लोहंबरे, संजय लोहंबरे, लक्ष्मण लोहंबरे, अरुण मोहूर्ले, गिरिधर रामटेके, सौ अजनाबई लोहंबरे, ओदमाबाई शेंडे, बायजाबाई गुरनुले, लताबाई मोहुर्ले, ताराबाई रामटेके, सूर्णा शेंडे यशवंत खोब्रागडे, बंदी शेंडे, प्रमोद भंडारे, देवाजी आलबंकर, सुधाकर गुरनुले आदी उपस्थित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!