Homeअहेरीउत्कृष्ट काम करणाऱ्या वनाधिकारी इ कर्मचाऱ्यांचा सत्कार

उत्कृष्ट काम करणाऱ्या वनाधिकारी इ कर्मचाऱ्यांचा सत्कार

अहेरी :- भारतीय स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्य गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक श्री डॉ . किशोर मानकर व आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री राहलसिंह टोलीया यांच्या मार्गदर्शना खाली आलापल्ली वनविभागातील आलापल्ली ,अहेरी , पिरमिली , पेड्डीगूडम , मार्कंडा, घोट व चामोर्शी वनपरिक्षेत्रा मध्ये ” हर घर तिरंगा ” या अभियानाचा एक भाग म्हणून मोठ्या प्रमाणांवर मोटरसायकल रैली , वृक्षारोपण , वकृत्य स्पर्धा , चित्रकला स्पर्धा , निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . वनसंपदा इमारत आलापल्लीच्या प्रांगणावर स्वातंत्र्य दिना निमित्य वनकर्मचारी यांच्या परेडचे आयोजन करण्यात आले होते . या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून श्री डॉ . किशोर मानकर वनसंरक्षक गडचिरोली वनवृत्त व अध्यक्ष म्हणून श्रीमती पियुशा जगताप उपवनसंरक्षक वाहतुक विभाग बल्लारशाह, श्री आशीष पांडे उपवनसंरक्षक भामरागड, श्री राहुलसिंह टोलीया उपवनसंरक्षक आलापल्ली , श्री वरून आर बी भावसे परिविक्षाधिन उपस्थित होते .

परेड मध्ये आलापल्ली व भामरागड वनविभागातील 11 वनपरिक्षेत्राच्या चमुने सहभाग घेतला होता . प्रथम क्रमांक घोट वनपरिक्षेत्राच्या पथकाने, द्वितीय क्रमांक आलापल्ली वनपरिक्षेत्राच्या पथकाने व तृतिय क्रमांक ताडगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने पटकाविला . सदर परेडचे परिक्षक म्हणून श्री राजेंद्र कातखेडे वनपरिक्षेत्र अधिकारी तथा माजी सैनिक यांनी काम पारपाडले . तसेच या प्रसंगी आलापल्ली वनविभागा अंतर्गत वन व वन्यजीवांचे संरक्षणाचे उत्कृष्ट काम करणारे वनविभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणारे 47 क्षेत्रीय कर्मचारी वनमजुर, वनरक्षक व वनपाल व कार्यालयीन काम करणारे लिपीक , लेखापाल यांना श्री डॉ . किशोर मानकर, श्रीमती पियुशा जगताप उपवनसंरक्षक यांच्या हस्ते गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले .

या प्रसंगी श्री डॉ. किशोर मानकर वनसंरक्षक यांनी परेडला संबोधीत करताना गडचिरोली वनवृत्ता अंतर्गत 12726.957 हेक्टर क्षेत्र असून सदर वनक्षेत्रांचे संरक्षण व संवर्धन करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी हि वनविभागाच्या खांद्यावर आहे . विकास कामांकरीता मोठ्या प्रमाणावर जंगल तोड होत असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भिती निर्माण झाली आहे . त्यामुळे पर्यावरणाचा समतोल अबाधित राहणे हे जिवसृष्टीच्या समृद्धी करीता महत्वपुर्ण असल्याने मोठया प्रमाणावर वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचे आवाहन केले . तसेच स्वतंत्र्य रनसंग्रामाच्या अग्नीकुंडात अनेक महान विरपुरूषांनी आपल्या प्राणाची आहुती देत आपल्या देशाला स्वतंत्र्य मिळवून दिले . ते स्वतंत्र्य अबाधित ठेवण्याचे जबाबदारी आपली सर्वांची असून गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त दुर्गम भागतील खेडेपाडे व टोले मधील घरा-घरांनवर या प्रसंगी फडकलेल्या तिरंगाध्वजांचे चित्र हे स्वतंत्र्यांची सुखद अनुभूती देणारे आहे असे मनोगत व्यक्त केले .

श्री राहुलसिंह टोलीया उपवनसंरक्षक यांनी परेडला संबोधीत करताना भारतीय स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवा निमित्य घेण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे तिरंगाध्वज विषयीचे प्रेम व आस्था जनसामान्या मध्ये वृद्धिंगत झाली असून प्रत्येक नागरीकांन मध्ये देशप्रेमाची भावना मोठ्या प्रमाणावर वाढली आहे . प्रत्येक क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांनी सामान्य नागरीकांन सोबत सलोख्याचे संबंध निर्माण करून वन व वन्यजीवाच्या शाश्वत विकास करीता जनसामान्याच्या सहभागातून वनाचा विकास करण्याचे आवाहन क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना केले .

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री नितेश शंकर देवगडे उपविभागीय वन अधिकारी व श्री रविंद्र सुकारे कार्यालय अधीक्षक यांनी तर आभार प्रदर्शन श्री प्रदिप बुधनवार प्रकाष्ट निष्कासन अधिकारी आलापल्ली यांनी मानले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आलापल्ली वनविभागातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयीन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!