Homeनागपूरप्रेम म्हणजे काय असतं?"

प्रेम म्हणजे काय असतं?”

“प्रेम म्हणजे काय असतं?”

प्रिय सोनल मॅडम,

बऱ्याचदा मला एक प्रश्न सतावत असायचा, श्रीकृष्णाने राधाशी लग्न का नसेल केलं? जिच्यावर एवढं निखळ, निस्वार्थ, भरभरून प्रेम केलं. तिच्याशी लग्न का नसेल केलं? याचे उत्तर मिळविण्याचे मी प्रयत्न देखील केले. मला विभिन्न तर्क असलेली उत्तर देखील मिळाली, पण श्रीकृष्णाची भक्त म्हणून मी ज्या भक्तिभावाने कृष्णाला ओळखलं, बघितलं त्यावरून माझ्या मनाला ती तर्क पटली नाही. जसजसी वैचारिक परिपक्वता विकसित होत गेली मला माझ्या प्रश्नाचं एक अंतिम आणि तार्किक उत्तर गवसलं.

श्रीकृष्णाने ज्या राधावर स्वत:पेक्षा अधिक प्रेम केलं तिच्याशी लग्न न करण्याच कारण किंबहुना समाजासमोर मांडायचा आदर्श हाच असायला हवा की ” जात, धर्म, श्रीमंती-गरिबी, मोह, शारीरिक आकर्षण, भावनिक ,शरीर, बाह्य सुंदरता किंवा बाह्य देखावा, लैगिकता, सो कॉल्ड “खानदान की इज्जत”, सामाजिक प्रतिष्ठा आणि एवढचं काय तर लग्न….

” या असंख्य मानवनिर्मित कृत्रिम बंधनाच्या कितीतरी पलीकडे प्रेम असते! खरे प्रेम असते? आणि म्हणूनचं की काय? लग्न जरी रूक्मिणीशी केलं तरी कृष्णाच्या नावाअगोदर, कृष्णाच्या अभंगात, कृष्णाच्या कथेत, कृष्णाच्या देऊळात, कृष्णाच्या हृदयात आणि कृष्णाच्या कणाकणात फक्त आणि फक्त राधाचं असते!

“बियॉन्ड सेक्स” ही कादंबरी वाचल्यानंतर अगदी हीच भावना माझ्या अंर्तमनातून आली! आजपर्यंत प्रेमावर कथा किंवा चित्रपट म्हटलं की त्याच टिनएजर च्या, कॉलेजातल्या तरूण मुला-मुलींच्या कहाण्या.”पॅच-अप”, “ब्रेक-अप” अश्या नावांनी प्रेमासारखी संवेदनशील भावना जोडणारी आणि तोडणारी ही तरूणाई…

त्यात तुमच्या कादंबरीतील वयाच्या चाळीशीतल्या एका आगळ्यावेगळ्या, निखळ प्रेमाची कथा नक्कीचं समाजासमोर एक आदर्श मांडते. संपूर्ण कथा,कथेतील पात्र,त्यांच्या भावना, मैत्री , प्रेम, समंजसपणा, एकमेकांप्रतिचा त्यांच्या नात्यांप्रतिचा आदर एकूण सगळचं अतिशय उत्कृष्ट आहे! आणि कादंबरीचं शिर्षक कथेला १००% न्याय देणार आहे..

सागर आणि मिराची मैत्री आणि निस्वार्थ प्रेमाबद्दल वाचून मी येथे एक स्वलिखित चारोळी लिहीण्याचा मोह आवरू शकले नाही ….

“कौन कहता है सहाब
की महज जिस्म सोप देने से ही
होती है मोहब्बत…
कहने को तो चंद्रमुखी भी एक तवायफ ही थी
पर उसे तो देवदास से बिना छुए ही
बेइंतेहा मोहब्बत हो गयी थी!”

सोनल मॅडम,तुमची लेखणी अशीच वृक्षाप्रमाणे बहरावी,आणि तिच्या नव अंकूरातून जन्मलेल्या साहित्यातून समाजाचा उद्धार व्हावा!

एकदा नक्कीच भेटेलं तुमच्याशी….
पुढील लिखाणाकरिता मन:पूर्वक शुभेच्छा.🌹

-निकिता अनु शालिकराम बोंदरे.

कोराडी,नागपूर.

Instagram:- @nikita_via_pen
Facebook:- @nikita_via_pen

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!