श्याम म्हशाखेत्री
जिल्हा संपादक, चंद्रपुर
चंद्रपुर: शहरातील पठाणपुरा रोडवरील जोडदेऊळ वॉर्ड इथे बारा वर्षीय मुलाच्या अंगावर अचानकपणे घराची भिंत कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृत मुलाचे नाव लोकेश बावणे असून तो मामाच्या घरी राहून शिक्षण घेत होता.
लोकेश चंद्रपुरातील लोकमान्य टिळक हायस्कूल येथे शिक्षण घेत होता. सुट्टी असल्याने आपल्या मित्रांसोबत खेळत असताना अचानक त्याच्या अंगावर भिंत कोसळली. त्यात लोकेशचा जागीच मृत्यू झाला. लोकेश हा आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता आणि नियतीने आपला डाव साधला. त्यामुळे बावणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.