साकारणार तिथे लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्र जागेची मोजणी करत असतांना बांधकाम विभागाचे कर्मचारी

260

बळीराम काळे/जिवती

जिवती:माणिकगड पाहाडावरील तालुक्यातील वणी(बु)येथे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री असतांना २०१९ मध्ये नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरीचे शासन निर्णय पारीत झाले होते.अडीच वर्षे पूर्ण होऊनही या प्राथमिक आरोग्य केंद्राची कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती.
राज्यात पुन्हा सता परिवर्तन होताच ठप असल्येल्या कामांना गती दिल्याने वणी(बु) येथिल मंजूर झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची ईमारत उभी व्हावी,याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे.वणी (बु) येथिल मंजुर प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन ईमारत लवकरात लवकर उभी व्हावी,यासाठी परिसरातील जनता मागील अनेक वर्षांपासून वाट पाहत आहे.
जागेची मोजणी करून अंदाजपत्रक तयार करण्याकरीता जि. प.बांधकाम विभाग जिवतीचे उपविभागीय अभियंता दळवी यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करून जागेची मोजणी केली.
नवीन बांधकामाच्या जागेची मोजणी करतांना जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेश देवकते व गावातील नागरिक मंडळी आदी उपस्थित होते.