Advertisements
Home चंद्रपूर भाजपचा " हर घर तिरंगा ' अभियान म्हणजे खोटारड्या देशभक्तीचा देखावा ...

भाजपचा ” हर घर तिरंगा ‘ अभियान म्हणजे खोटारड्या देशभक्तीचा देखावा स्वातंत्र्य गौरव पदयात्रा सभेत माजी मंत्री वडेट्टीवारांचे टीकास्त्र

देशाच्या स्वातंत्र्यानंतर सतत राष्ट्रध्वजाचा तिरस्कार करणारे सत्ताधारी आज देशाची डबघाईस आलेली आर्थिक स्थिती, वाढती महागाई व ,बेरोजगारी यामुळे आलेले अपयश लपवण्यासाठी जनतेपुढे देशभक्तीचा कांगावा करून मिरवत आहे. अशा लबाड , ढोंगी देशभक्त व राजकीय सत्ता पिपासूंच्या दडपशाही धोरणामुळेच देशाला उतरती कळा लागली आहे.आज जर सावधगिरी बाळगली नाही तर उद्या भयावह परिस्थितीला सामोरे जावे लागेल. भाजपचा हर घर तिरंगा अभियान हे केवळ खोटारड्या देशभक्तीचा देखावा असून यामागे धूर्त सत्ताधाऱ्यांची मुह मे राम.. बगल में छुरी अशी दुटप्पी भूमिका आहे. असे टिकास्त्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव निमित्ताने सिंदेवाही येथे आयोजित पदयात्रा सभेत भाजप वर सोडले.

Advertisements

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार काल गोंडपीपरी तालुक्यातील करंजी येथून स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव निमित्ताने सुरू झालेल्या गौरव पदयात्रेचा दुसऱ्या दिवसाची सुरुवात मुल येथून सिंदेवाही मार्गे क्रांतीभूमी चिमूर दिशेने करण्यात आली. याप्रसंगी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार , काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला ग्रामीण जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर, यांच्या नेतृत्वात प्रामुख्याने कॉग्रेस जिल्हा महासचिव प्रमोद बोरीकर, मुन्ना तावाडे, सिंदेवाही तालुका काँग्रेस अध्यक्ष रमाकांत लोधे, सावली तालुकाध्यक्ष नितीन गोहणे,उपाध्यक्ष संजय गाहाने, शहराध्यक्ष सुनिल उट्टलवार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयुर सूचक सावली नगराध्यक्ष लता लाकडे, , महीला काँग्रेसच्या सीमा सहारे, माजी जी.प.सभापति संदिप गड्डमवार, दिनेश चिटनुरवार ,तसेच सिंदेवाही व सावली तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सर्व सेलचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ. वडेट्टीवार म्हणाले की, इंग्रजांनी देश जोडल्यानंतर मिळालेल्या स्वातंत्र्याच्या काळात देशाच्या प्रगतीची पायाभरणी ही काँग्रेस पक्षानेच केली. देशात शैक्षणिक औद्योगिक क्रांती घडवून खऱ्या लोकशाहीच्या धोरणातून देशाचा विकास साधला. मात्र सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी आयत्या बिळात नागोबा अशा दिशाभूल राजकारणाचे सोंग पांघरून जनसामान्यांपुढें श्रेयांचा खोटा पाढा वाचला जात आहे. अशा दडपशाही सरकारशी लढा देण्यासाठी पुन्हा नव्या क्रांतीची मशाल पेटवणे काळाची गरज ठरली असून देशासाठी प्राणाची बलिदान देणाऱ्या थोर नेत्यांच्या काँग्रेस पक्षाला सत्तेवर आणणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, सूत्रसंचालन नगरसेवक युनूस शेख, यांनी केले. याप्रसंगी सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर गौरव पदयात्रा नवरगाव मार्गे क्रांतीभूमी चिमूर कडे वळती झाली.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

महाकाली महोत्सवात सराफा असोशिएशन देणार ८ किलो वजनाची माता महाकाली मातेची चांदीची मुर्ती…#महाकाली महोत्सवाची दुसरी नियोजन बैठक संपन्न…

चंद्रपुर: नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात चंद्रपूरातील दान दात्यांनी समोर येण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. त्यांच्या आवाहणा...

शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर द्वारा पुरस्कार जाहीर…# पंचायत समिती गोंडपीपरी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते वितरण…

सुरज पि. दहागावकर (कार्यकारी संपादक) गोंडपिपरी: शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था असून ती शैक्षणिक,सामाजिक,साहित्य व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करते.शब्दांकुर फाउंडेशनतर्फे "ध्यास एक...

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री यांचा चंद्रपुर महिला काँग्रेस ने  केला निषेध

चंद्रपुर: केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी हे चंद्रपूर च्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. केंद्र सरकारने सतत पेट्रोल, डिझेल, गॅस यात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

महाकाली महोत्सवात सराफा असोशिएशन देणार ८ किलो वजनाची माता महाकाली मातेची चांदीची मुर्ती…#महाकाली महोत्सवाची दुसरी नियोजन बैठक संपन्न…

चंद्रपुर: नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात चंद्रपूरातील दान दात्यांनी समोर येण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. त्यांच्या आवाहणा...

तालुक्यात ग्रापंचायतींच्या निवडणूका जाहीर होताच ग्रामीण भागात सर्वत्र धावपळ कोन होनार सरपंचपदाचा मानकरी यासाठी लागली चुरस

बळीराम काळे,जिवती जिवती (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील २९ ग्राम पंचायतित सार्वत्रिक निडणुकी कार्यक्रम जाहीर झाला असून,१३ ॲक्टोबर २०२२ ला मतदान होणार आहे. तरी राज्य निवडणुक आयोगाच्या...

स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक) चंद्रपुर: स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्राईस्ट रुग्णालय, चंद्रपुर व सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली यांच्या संयुक्त विद्यमाने...

शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर द्वारा पुरस्कार जाहीर…# पंचायत समिती गोंडपीपरी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते वितरण…

सुरज पि. दहागावकर (कार्यकारी संपादक) गोंडपिपरी: शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था असून ती शैक्षणिक,सामाजिक,साहित्य व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करते.शब्दांकुर फाउंडेशनतर्फे "ध्यास एक...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!